स्मार्टफोनला 'व्हायरस'पासून वाचवायचं आहे? मग, 'या' 5 सोप्या टिप्स फाॅलो करा I Smartphone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smartphone

'स्मार्टफोन' हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

स्मार्टफोनला 'व्हायरस'पासून वाचवायचं आहे? मग, 'या' 5 सोप्या टिप्स फाॅलो करा

How to Protect Smartphone From Malware : 'स्मार्टफोन' (Smartphone) हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. याचं कारण म्हणजे, आजकाल बहुतेक कामं घरी बसून मोबाईल फोनद्वारे केली जातात. परंतु, स्मार्टफोनवरील या वाढत्या अवलंबित्वाचा फायदा 'हॅकर्स' (Hackers) घेत आहेत. जे मोबाईल वापरकर्त्यांच्या फोनमध्ये व्हायरस (Virus) टाकून बँक खातं (Bank Account) रिकामं करताहेत. जर तुम्हीही स्मार्टफोनला व्हायरसच्या जाळ्यात अडकण्यापासून कसं वाचवायचं याची काळजी करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचं पालन केल्यास तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल.

1) सर्व प्रथम कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका किंवा अशी कोणतीही लिंक उघडण्याची चूक करू नका.

2) एवढंच नाही तर तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवावं लागेल की, अशा कोणत्याही लिंकवर फाईल दिली असेल तर ती विसरूनही डाउनलोड करण्याची चूक करू नका. कारण, व्हायरसनं भरलेली ही फाइल डाउनलोड केल्यानं तुमचा स्मार्टफोनही हॅक (Smartphone Hack) होऊ शकतो.

हेही वाचा: Xiaomiचा स्टायलिश स्मार्टफोन लाँच; 18 मिनिटांत होतो पूर्ण चार्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये

3) समजा जर तुम्हाला एखादी लिंक मिळाली, ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल अॅप डाउनलोड (Mobile App Download) करण्यास सांगितलं जात असेल तर सावध व्हा. कारण, हे अॅप तुमच्यासाठी व्हायरसचा सापळा देखील बनू शकतं, यामुळं तुमचं नुकसानही होऊ शकतं.

4) फ्री वायफायच्या (Free WiFi) बाबतीत बोलायचं झालं तर, लोक अनेकदा आपला फोन सार्वजनिक वाय-फायशी कनेक्ट करतात. पण, असं करणं तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. कारण, फुकटच्या गोष्टी कुठंतरी तुम्हाला व्हायरसच्या तावडीत अडकू शकतात.

हेही वाचा: Koo Update : 'कू ॲप'ला मिळाले 'हे' नवीन फीचर्स; जाणून घ्या सविस्तर

5) फोनला मालवेअर किंवा व्हायरसपासून वाचवण्यासाठी तुमच्याकडं चांगल्या दर्जाचा अँटीव्हायरस (Antivirus) असावा, जो तुम्हाला कोणत्याही अडचणीत येण्यापासून वाचवू शकेल. कारण, अँटी-व्हायरस तुम्हाला सतर्क करतो.

Web Title: Smartphone 5 Tips How To Protect Smartphone From Virus Or Malware Follow These 5 Mobile Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top