
Smartphone Tips : आला 7GB RAM असलेला भारतातला सर्वात स्वस्त फोन, किंमत 8 हजारांपेक्षा कमी
Smartphone Tips : भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजार सध्या स्वस्त स्मार्टफोनने भरलेला आहे. ग्राहक कमी किंमतीत जास्त फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स खरेदी करत आहे. प्रामुख्याने दहा पंधरा हजार रुपयांच्या बजेट स्मार्टफोन्सला ग्राहकांची मागणी आहे. त्यामुळे कंपन्या देखील दहा हजारांच्या बजेटमधील शानदार स्मार्टफोन्स लाँच करत आहे. काही दिवसांपूर्वीच लावाने बजेट ग्राहकांसाठी Lava Yuva 2 Pro लाँच केला आहे. या फोनच्या फीचर्स बद्दल बोलायच झाल्यास या हँडसेटमध्ये MediaTek Helio प्रोसेसर देण्यात आलाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला 7GB पर्यंत रॅम सपोर्ट आहे.
Lava Yuva 2 Pro ची भारतात किंमत : या Lava स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज देण्यात आलाय. या मॉडेलची किंमत 7,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्लास लॅव्हेंडर, ग्लास व्हाइट आणि ग्लास ग्रीन या तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्ही हा फोन खरेदी करू शकाल.
Lava Yuva 2 Pro स्पेसिफिकेशन्स : फोनमध्ये 6.5-इंचाचा HD प्लस नॉच डिस्प्ले आहे जो 720x1600 रिझोल्यूशन ऑफर करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी तुम्हाला MediaTek Helio G37 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये 4 जीबी रॅमसह 3 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे, म्हणजेच तुम्ही 8 हजार एवढ्या कमी किंमतीत 7 जीबी रॅमचा लाभ घेऊ शकाल.
कॅमेरा : फोनच्या मागील पॅनलवर तीन रियर कॅमेरे, 13MP प्रायमरी AI कॅमेरा, दोन VGA कॅमेरा सेन्सरसह आहेत. 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा फोनच्या पुढील बाजूस आहे.
कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी : ड्युअल 4 जी सपोर्ट, वाय-फाय, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ब्लूटूथ व्हर्जन 5.1 सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला हाय पॉवर देण्यासाठी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.