आता ‘व्हॉल्व्हो’ची येणार इलेक्ट्रिक कार

मोहित
रविवार, 14 मे 2017

व्हॉल्व्हो ही जगभरात ऑटो क्षेत्रातील नावाजलेली स्वीडनची कंपनी आहे. व्हॉल्व्हो कंपनीने लक्‍झरी, तसेच कार निर्मितीत जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. हीच कंपनी आता इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीत उतरत आहे. शाँघाय येथे यावर्षी होणाऱ्या ‘ऑटो शो’मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार असल्याची माहिती या कंपनीने दिली आहे. २०१९ पर्यंत ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या कारची निर्मिती चीनमध्ये केली जाणार असून, तेथूनच ती जगभरात एक्‍स्पोर्ट केली जाणार आहे.

कधी काळी ‘फोर्ड’ या कंपनीच्या अधिपत्याखाली असलेली स्वीडनची व्हॉल्व्हो कंपनी २०१० मध्ये चीनच्या ‘जिली’ या कंपनीने विकत घेतली आहे. त्यानंतर कंपनीने सेकंड जनरेशन असलेल्या ‘एक्‍ससी९०’ या कारचा पूर्णपणे कायापालट केला आहे.
इलेक्ट्रिक कार व्हॉल्व्होच्या कॉम्पॅक्‍ट मोड्यूलर आर्किटेक्‍चर (सीएमए) या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मवरूनच व्हॉल्व्होच्या दोन ४० सीरिजच्या कार एक्‍ससी ४० (४०.१) आणि एस ४० (४०.२) तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही कार गतवर्षी मेमध्ये सादर करण्यात आल्या होत्या.

व्हॉल्व्हो कंपनीने २०२५ अखेरपर्यंत जगभरात सुमारे १० लाख इलेक्ट्रिक कार विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्केलेबल प्रोडक्‍ट आर्किटेक्‍चरच्या (एसपीए) प्लॅटफॉर्मवरही इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्यावर कंपनीचे सध्या काम सुरू आहे. या प्लॅटफॉर्मवरच व्हॉल्व्होच्या ९० सीरिजमधील ‘एक्‍ससी९०’, ‘एस९०’, ‘व्ही९०’ या कारची निर्मिती करण्यात आली आहे. व्हॉल्व्होच्या इलेक्ट्रिक कारची किंमत २६ लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: smartsobati article in sci-tech

टॅग्स