फेसबुकची नवी ओळख ‘मेटाव्हर्स’? २८ ऑक्टोबरला नाव बदलण्याची शक्यता

Facebook
Facebook sakal media

मुंबई : जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया (social media) कंपनी फेसबुक (Facebook) आता त्यांची ओळख आणि नवा रीब्रँड (rebrand) करण्याच्या तयारीत आहे. ‘द व्हर्ज’ने दिलेल्या वृत्तानुसार (the verge news) २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या फेसबुकच्या वार्षिक कार्यक्रमात (annual event) याबाबतची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) सध्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेटाव्हर्स’ या संकल्पनेवर काम करत असून फेसबुकच्या रीब्रॅण्डिंगअंतर्गत ‘मेटाव्हर्स’वर विशेष भर दिला जाणार असल्याचीही चर्चा आहे.

Facebook
रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आरोपी करणार का? हायकोर्टाचा सवाल

मार्क झुकेरबर्ग फेसबुकच्या रीब्रॅण्डिंगनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकाच ब्रॅण्डिंगखाली आणण्याच्या तयारीत आहे. त्यातही व्हर्चुअल रिअॅलिटी आणि इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या साह्याने आणि व्हीआर सेटअपच्या मदतीने ‘मेटाव्हर्स’ सोशल मीडियाचा चेहरामोहरा बदलवणार आहे. त्यासाठी फेसबुकने काही दिवसांपूर्वी पाच कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. त्यापाठोपाठ मेटाव्हर्ससाठी दोन दिवसांपूर्वी त्यांनी युरोपात १० हजार तंत्रज्ञांची भरती करणार असल्याचे जाहीर केले होते.

‘मेटाव्हर्स’चा वापर कसा?

सध्या तरी काल्पनिक वाटत असलेली ‘मेटाव्हर्स’ची दुनिया ही निश्चितच विस्मयकारी असेल. ‘मेटाव्हर्स’च्या मदतीने तुम्हाला कार्यालयात जाता येईल, मित्र-मैत्रिणींना भेटता येईल, चक्क स्टेडियमवर जाऊन सामन्याचा आनंदही लुटता येईल, तेही घरबसल्या. त्यासाठी व्हीआर सेटअपच्या मदतीने तुम्हाला घरात बसून इंटरनेट आणि व्हर्च्युअल रिॲलिटीच्या मदतीनं वरील बाबींचा अनुभव घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com