शीतपेयांच्या अतिरेकाने वाढतो कमरेचा घेर

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

शीतपेयांच्या अतिरेकी सेवनाचे शरीरावर विपरीत परिणाम होतात, मात्र चरबी कमी करण्यासाठी डाएट सोड्यासारखे शीतपेय घेत असल्यास अधिक सावध राहण्याची गरज आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात अशा शीतपेयांमुळे कमरेच्या भागातील चरबीचे प्रमाण वाढून तिचा घेर वाढत असल्याचे आढळले आहे. टेक्‍सास युनिव्हर्सिटीच्या हेल्थ सायन्स सेंटरने हे संशोधन केले.

या अभ्यासात संशोधकांनी 65 वर्षांवरील जवळपास 750व्यक्तींचे आरोग्य आणि जीवनशैलीचा तब्बल नऊ वर्षे अभ्यास केला. या व्यक्तींच्या सोड्याच्या सेवनाच्या प्रमाणाचीही नोंद ठेवण्यात आली. प्रमुख संशोधक शेरॉन फोवलर म्हणाले,""डाएट सोडा न घेणाऱ्या व्यक्तींच्या कमरेचा घेर एक इंचापेक्षा कमी वाढला, तर कधीतरी किंवा दिवसाला एकापेक्षा कमी सोडा पिणाऱ्या व्यक्तींच्या कमरेचा घेर जवळपास दोन इंचापर्यंत वाढलेला आढळला. दररोज एकापेक्षा अधिक सोड्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या कमरेच्या घेरात तीन इंचापेक्षा अधिक वाढ झाली होती. शीतपेयांच्या अतिरेकी सेवनामुळे प्रौढांमध्ये मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात व कर्करोगाचा धोकाही निर्माण होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soft Drinks waistline increases the atirekane