सौरऊर्जेवर चालणारे आदर्श घर! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

आयआयटीयन्सची किमया; सोलार डिकॅथॉनसाठी चीनला जाणार 

टीम शून्य या 70 विद्यार्थ्यांच्या चमूने दिवसरात्र खपून "प्रोजेक्‍ट सोलराईज' हा प्रयोग यशस्वी केला... 

मुंबई : सौरऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाच्या दृष्टीने आदर्श घराची बांधणी आयआयटी मुंबईच्या टीम शून्यने केली आहे. चीनमधील"सोलार डिकॅथॉन'स्पर्धेत सहभागी होण्याची संधी या टीमला मिळणार आहे. सोलार हाऊसिंगमधील अद्ययावत तंत्रज्ञान सादर करण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे.

आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या शहराच्या निमित्ताने"प्रोजेक्‍ट सोलराईज' हा प्रयोग मुंबईतील आयआयटीच्या"टीम शून्य'ने केला आहे. पारंपरिक वास्तू रचनेला आधुनिक डिझाईन्सची जोड देऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. घराचे मॉडेल विशिष्ट पद्धतीचे आहे. त्याचा फायदा सरकारी अधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगार वसाहतींना होणार आहे. दोन हजार चौरस फुटांच्या घरासाठी ही रचना करण्यात येणार आहे. ऊर्जा संवर्धन करणाऱ्या घराचे हे मॉडेल आहे. अशा घरांमुळे नवीन उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या संधीही वाढतील, असे"टीम शून्य'ला वाटते. आयआयटीतील 70 विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. 

असे आहे मॉडेल 
युरोपातील"सोलार डिकॅथॉन'मध्ये आयआयटीच्या चमूने 2014मध्ये ही भाग घेतला होता. आता या घराच्या रचनेत बदल झाले आहेत. नैसर्गिक पद्धतीने घरात हवा खेळती राहील. प्रकाशव्यवस्था तसेच तापमानाचे नियंत्रण, सोलार ओव्हन, कपड्यांसाठी ड्रायर, सौरऊर्जेवर स्वयंपाकाची व्यवस्था या घरात आहे. ही सगळी विजेची गरज सौरऊर्जेतून भागवण्यात येईल. 
 
Web Title: Solar ideal home!