esakal | बंदीनंतरही चिनी ऍप भारतात नव्या अवतारात; डाऊनलोड कोटींत
sakal

बोलून बातमी शोधा

ban china apps

सीमेवरील भारत-चीनमधील वाढत्या तणावावर भारताने चीनवर मोठं सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. देशातील राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने सुरुवातील टिकटॉकसह 59 चीनी ऍपवर बंदी घातली होती.

बंदीनंतरही चिनी ऍप भारतात नव्या अवतारात; डाऊनलोड कोटींत

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: सीमेवरील भारत-चीनमधील वाढत्या तणावावर भारताने चीनवर मोठं सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. देशातील राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने सुरुवातील टिकटॉकसह 59 चीनी ऍपवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै महिन्यात 47 तर सप्टेंबरमध्ये पबजीसह 118 ऍपना भारतात बॅन केलं होतं. या बंदीनंतर भारतात भरपूर स्वदेशी ऍपची निर्मिती होत आहे. अशातच आता नवनवीन चीनी ऍप भारतातील युजर्सपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील काही महिन्यांपासून प्ले स्टोअरवर चीनी ऍपची संख्याही वाढताना दिसत आहेत. एका रिपोर्टनुसार बॅन केलेल्या चिनी ऍपचे रिब्रँडेड वर्जन यात असल्याचं दिसलं आहे.     

सध्या भारतात काही चिनी ऍप बॅन केल्यानंतरही नाव बदलून मार्केटमध्ये आले आहेत. याचं एक उदाहरण म्हटलं तर स्नॅक व्हिडिओ ऍप आहे. हे ऍप टेन्सेंटच्या kuaishou या चिनी कंपनीने बनवलं आहे. महत्वाचे म्हणजे हे ऍप हुबेहुब Kwai या ऍपप्रमाणे दिसतं. हे ऍप केंद्र सरकारने बॅन केलं होतं. स्नॅक व्हिडिओ हे ऍप सध्या गुगल प्लेवर 10 कोटींपेक्षा जास्त जणांनी डाउनलोड केलं आहे. तसेच या ऍपमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिध्द झालेल्या टिकटॉकसारखी फिचर्सही आहेत. याबद्दलची बातमी इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे.   

थांबा! ऑक्सिजन चेक करण्यासाठी Apps वापरताय? भारत सरकारने दिला इशारा

अजूनही बरीच चिनि ऍप अशाप्रकारे बॅन असताना भारतात रिब्रँडेड होऊन आलेली दिसतात. यामध्ये Hego या ऍपचाही सामावेश आहे, आता या ऍपची जागा ola party नावाच्या ऍपने घेतली आहे. यामध्ये पहिले अनोळखी लोकांसोबत चॅट रुम तयार करणं आणि गेम्स खेळण्याची सुविधा मिळत होती. आता या ऍपमध्ये गेम खेळण्याची सोय नसून Hego ऍप युझर्सच्या प्रोफाईल, चॅट रुम्स आणि फ्रेंड्सना इंपोर्ट करण्यात आलं आहे. अशा युजर्सना थेट Ola Party या ऍपवर थेट साईन करता येत आहे. यामुळे केंद्र सरकारने केलेल्या चिनी ऍपवरील बंदीला दुसऱ्या मार्गाने चिनी ऍप शह देत असल्याचे दिसत आहे. 

Google आणि Apple ने हटवली 7 ॲप्स, तुमच्याकडे असतील तर Delete करा

सरकार काय कारवाई करणार का?
हे जुनेच चिनी ऍप नवीन रुपात आले असल्याने सरकार यावर काय पाऊल उचलणार का? या प्रश्नाला उत्तर देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "जर यामध्ये काही चुकीचं आढळलं तर यावर नक्कीच आम्ही कठोर पाऊले घेऊ. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतेही चिनी ऍप असं करताना आढळलं तर त्याच्या नवीन रुपात आलेल्या ऍपवरही बंदी घालण्यात येईल."

(edited by- pramod sarawale)

loading image