esakal | सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी SpaceX करणार भारतीय कंपन्यांसोबत काम
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk

स्पेसएक्स भारतात पुढच्या वर्षी हाय स्पीड सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरु करणार आहे.

सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी SpaceX करणार भारतीय कंपन्यांसोबत काम

sakal_logo
By
सूरज यादव

एलन मस्क यांची स्पेस एक्स ही कंपनी आता भारतीय कंपन्यांसोबत काम करण्याची शक्यता आहे. भारतात सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी आवश्यक साधने तयार करण्यासाठी भारतीय कंपन्यांसोबत कराराची तयारी स्पेस एक्सकडून सुरु आहे. स्पेसएक्स भारतात पुढच्या वर्षी हाय स्पीड सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरु करणार आहे. दरम्यान, आता नव्या योजनेंतर्गत स्पेस एक्स भरतीय कंपन्यांच्या माध्यमातून अँटिना सिस्टिम, युजर्स टर्मिनल डिव्हाइस आणि इतर सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणांची निर्मिती करेल.

कंपनीचे संचालक मॅट बॉटविन यांनी सांगितलं की, स्पेसएक्स स्टारलिंकच्या उपकरणांच्या उत्पादनासाठी भारतीय कंपन्यांसोबत मिळून काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. भारताच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचे सचिव अंशू प्रकाश यांच्याशी चर्चेवेळी मॅट बॉटविन यांनी याबाबतची माहिती सांगितल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे.

बॉटविन यांनी म्हटलं की, स्पेस एक्सने नेहमीच जागतिक पुरवठा साखळी वाढवण्यासाठी संधी शोधली. आता आम्ही यासाठी भारतातही सहकारी शोधत आहे. टेलिकम्युनिकेशन विभागाने ग्लोबल सॅटेलाइट कंपन्यांसोबत बैठक बोलावली होती. यामध्ये रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया, वनवेब, एअरटेल, डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि ट्रायचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते.

हेही वाचा: डेटा चोरीतून खासगी आयुष्य चव्हाट्यावर, सोशल मीडिया कंपनी चर्चेत

स्पेसएक्स बराच काळ झालं भारतातील कंपन्यांसोबत काम करत आहे. त्यांच्या अनेक रॉकेटसाठी आवश्यक असलेल्या स्टील आणि स्टील ट्यूबिंगचे मटेरिअल खरेदी करत आहे. आता सॅटेलाइट ब्रॉडबँढसाठी हार्डवेअर आणि सॅटेलाइट उपकरणे तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही बॉटविन यांनी सांगितलं.

स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्विस भारतात सुरु होणार असून त्याच्या बेट व्हर्जनसाठी स्पेसएक्सकडून सध्या ऑर्डर्स स्वीकारल्या जात आहेत. यासाठी 7 हजार रुपये डिपॉझिट घेतलं जात आहे. हे डिपॉझिट रिफंडेबल आहे. भारतात 2022 पर्यंत सॅटेलाइट ब्रॉडबँड सर्विस सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

loading image