दोन माणसे पाठविणार 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

फ्रान्स : चंद्रावर दोन पर्यटक पाठविण्याची स्पेस एक्‍स या खासगी अवकाश संस्थेची योजना आहे. 2018 सालामध्ये हे दोन प्रवासी पाठविण्यात येणार असून, या प्रवासाचा खर्च प्रवासी स्वत: करणार आहेत. नासाने 1960 आणि 1970 मध्ये अपोलो मिशननंतर चंद्रावर अंतराळवीर पाठविले नसल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. 

याबाबत माहिती देताना स्पेस एक्‍सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी आम्ही ही घोषणा करताना फारच उत्साहित आहोत असे म्हटले आहे. बऱ्याच वर्षांनंतर ही संधी उपलब्ध झाल्याने याबाबत इतरांनाही उत्सुकता असून, या दोन्ही पर्यटकांनी अनामत रक्कमही जमा केली असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षाअखेर त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली जाईल व पुढील वर्षी ते अवकाशात झेपावतील असेही ते म्हणाले. पर्यटकांची नावे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. या मोहिमेला लोक चांगला प्रतिसाद देत असून, आणखी काही लोकांनीही या प्रवासाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात अशा आणखी मोहिमा आखण्याचा विचार असल्याचेही मस्क या वेळी म्हणाले.

Web Title: SpaceX plans to send two people around the Moon in late 2018