Facebook चं रॅपर्ससाठी BARS नावाचं विशेष ऍप; TikTok सारखेच फिचर्स

BARS app
BARS app

औरंगाबाद: भारतात टिक टॉक बंद झाल्यापासून टिक टॉकचे चाहते नाराज झाले होते. पण आता ज्यांना टिक टॉकवर व्हिडीओ तयार करायला आवडत होते आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण फेसबूकने त्याचं नवीन ऍप काढलं आहे ज्याच्यात टिक टॉक सारखे फिचर आहेत.

या ऍपचं नाव BARS app आहे. त्यातल्या त्यात या ऍपचा रॅपरला मोठा उपयोग होणार आहे. हे नवीन ऍप फेसबूकच्या New Product Experimentation (NPE) R&D टीमने तयार केलं आहे. सध्या हे ऍप टेस्टींगसाठी उपलब्ध आहे. या ऍपद्वारे रॅपरना रॅप करायला मदत होणार आहे.

फेसबूकच्या या BARS या ऍपमध्ये तुमच्या शब्दांना प्रोफेशनल-स्टाईल रॅपमध्ये रुपांतर करण्यासाठी प्री- रेकॉर्डेड बीट्सही उपलब्ध आहेत. तसेच या ऍपमध्ये rhyming dictionary चा ही उपयोग करता येणार आहे. तसेच यात एक चॅलेंज मोडही उपलब्ध असून यात ऑटो-सजेस्टिड वर्ड्स क्लू सोबत म्हणण्याच्याही सोय आहे.

यात अनेक ऑडिओ आणि विजुअल फिल्टर दिले आहेत. विषेश म्हणजे यात व्होकल आउटपुट बदलण्यासाठी प्रीलोडेड टूल्सचाही आहेत, त्यामध्ये Clean, AutoTune, Imaginary Friends आणि AM Radio चा समावेश होतो. यातील तयार केलेले व्हिडीओ सोशल मीडियाच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरही शेअर करता येतात.

गेल्या वर्षी मे महिन्यात फेसबुकच्या NPE टीमने कोलाब (Collab) नावाचे अॅप सादर केले होते, जे आयओएससाठी सार्वजनिक वापराकरिता डिसेंबरमध्ये उपलब्ध झाले होते. कोलाब अॅप एक टिक-टॉकच्या धर्तीवर डिझाइन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com