English Homework : चॅट जीपीटी वापरून केला होमवर्क, पण एक चूक पडली महागात! अशी पकडली चोरी

या होमवर्कमध्ये असलेल्या एका ओळीमुळे विद्यार्थ्याची ही ट्रिक शिक्षकांच्या लक्षात आली.
ChatGPT Homework Copy
ChatGPT Homework CopyEsakal

ओपन एआयने गेल्या वर्षी चॅटजीपीटी हा एआय चॅटबॉट लाँच केला होता. यानंतर या आणि इतर एआय सॉफ्टवेअर्सनी जगात धुमाकूळ घातला आहे. एआय सॉफ्टवेअरमुळे बरीच कामं सोपी झाली आहेत. लोक दिवसेंदिवस याचे अनेक उपयोग शोधत आहेत. कित्येक विद्यार्थी या एआयच्या माध्यमातून आपला होमवर्क आणि रिसर्च देखील करून घेत आहेत. अशाच एका विद्यार्थ्याचा किस्सा सध्या व्हायरल होतोय.

रोशन पटेल या ट्विटर यूजरने आपल्या भावाचा किस्सा शेअर केला आहे. सातवीतील या विद्यार्थ्याने आपला इंग्लिशचा होमवर्क करण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला. मात्र, केवळ एका चुकीमुळे शिक्षकांना त्याची ही ट्रिक कळाली. रोशनने आपल्या भावाच्या होमवर्कचा फोटोच ट्विटमध्ये पोस्ट केला आहे.

ChatGPT Homework Copy
ChatGPT : Smart ChatGPT ठरली बालिश; एका युजरला म्हणाली Sorry , त्याने Screenshot केला व्हायरल!

अशी पकडली चोरी

या होमवर्कमध्ये असलेल्या एका ओळीमुळे विद्यार्थ्याची ही ट्रिक शिक्षकांच्या लक्षात आली. "मी एआय लँग्वेज मॉडेल असल्यामुळे, मला वैयक्तिक मतं किंवा अपेक्षा नाहीत" असं वाक्य चॅटजीपीटीने आपल्या उत्तरात लिहिलं होतं. विद्यार्थ्याने कम्प्युटरवर पाहून हाताने होमवर्क लिहिला असला, तरीही या वाक्यामुळे शिक्षकांच्या लक्षात आलं की त्याने कॉपी केली आहे.

एवढंच नाही, तर या विद्यार्थ्याने आपल्या होमवर्कमध्ये 'poignant' हा शब्द वापरला होता. सातवीतील विद्यार्थ्याला हा शब्द माहिती असण्याची शक्यता अगदी कमी असल्यामुळे विद्यार्थ्याने चीटिंग केल्याची शंका शिक्षकांना आली. शिक्षकांनी होमवर्कमधील वरील वाक्य आणि हा शब्द या दोन्ही गोष्टी हायलाईट केल्या.

ChatGPT Homework Copy
ChatGPT : "AI वर कंट्रोल हवे नाही तर.." चॅट जीपीटी किंगनेच दिला धक्कादायक इशारा

ट्विट होतंय व्हायरल

हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. ट्विटर यूजर्स यावर विविध प्रकारची मतं व्यक्त करत आहेत. कॉपी करायलाही अक्कल लागते. असं मत बहुतांश ट्विटरकरांनी व्यक्त केलंय. तर, एआय हे केवळ हुशार लोकांसाठीच आहे असं मत एकाने व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com