स्वामिनाथन यांना MRSI-ICSC पुरस्कार

पीटीआय
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

स्वामिनाथन आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी 'सास्त्र' नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरिअल केंद्रामध्ये (CeNTAB) केलेले वैज्ञानिक प्रयोग आणि सैद्धांतिक कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

तंजावर : मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाच्या (MRSI-ICSC) वतीने देण्यात येणारा 'उच्च वाहकता आणि पदार्थ विज्ञान' वार्षिक पुरस्कार यंदा नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरिअल केंद्राचे (CeNTAB) संचालक एस. स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात आला. 

मुंबईतील IIT येथे आयोजित MRSI-ICSC संस्थेच्या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे अध्यक्ष सुरेश दास यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात आला. 
स्वामिनाथन हे सास्त्र विद्यापीठाच्या प्रायोजित संशोधन विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही काम पाहत आहेत. 

स्वामिनाथन आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी 'सास्त्र' नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरिअल केंद्रामध्ये (CeNTAB) केलेले वैज्ञानिक प्रयोग आणि सैद्धांतिक कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
 

Web Title: Swaminathan receives MRSI-ICSC award for 2017