ट्विटरवर सध्या एकच ट्रेंड #Switch_to_BSNL

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विविध मोबाईल कंपन्या 3G, 4G सारख्या सुपरफास्ट इंटरनेट सेवा पुरवत आहेत.

पुणे : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विविध मोबाईल कंपन्या 3G, 4G सारख्या सुपरफास्ट इंटरनेट सेवा पुरवत आहेत. मात्र, भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलच्या ग्राहकांचे प्रमाण कमी होते. आता त्याचा वापर वाढावा यासाठी ट्विटवर सध्या #Switch_to_BSNL हा एकच ट्रेंड सुरु आहे.

खासगी मोबाईल कंपन्यांचा वापर युजर्सकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, बीएसएनएलचा वापर त्या तुलनेने कमी आहे. आता बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या वाढावी, यासाठी #Switch_to_BSNL हा हॅशटॅग ट्विटरवर सध्या सुरु आहे. 

आपल्या खासगी नेटवर्क विसरून जावा आणि आता नवं तंत्रज्ञान बीएसएनएलमध्ये सामील व्हा, असे ट्विटच सध्या अनेक नेटिझन्सकडून केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Switch to BSNL is Trending on Twitter