
Tata Electric Cars Discount : 'या' इलेक्ट्रॉनिक कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, लगेच घ्या संधीचा फायदा
Tata Electric Cars Discount : सध्या देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीचा ग्राफ झपाट्याने उंचावत आहे. त्याच वेळी, सरकार इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएलआय (प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज) योजनेंतर्गत सहाय्य प्रदान करत आहे. त्यामुळे टाटा आपल्या कारवरही चांगली सूट देत आहे. चला तर आज आपण टाटा कारवर दिल्या जाणाऱ्या सवलतींची माहिती जाणून घेऊया.
टाटाकडून मिळेल इतकी सूट
टाटा सध्या आपल्या सर्व इलेक्ट्रिक कारवर चांगली सूट देत आहे. जर तुम्ही Tata ची Nexon EV Max खरेदी केली तर तुम्हाला 80,000 रुपयांची सूट दिली जाईल. दुसरीकडे, तुम्ही Tata EV प्राइम खरेदी केल्यास या इलेक्ट्रिक कारवर 90,000 रुपयांची सूट मिळेल. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार ही टाटाची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे.
जानेवारी महिन्यातही दिली गेली मोठी सूट
टाटाने जानेवारीतही आपल्या इलेक्ट्रिक कारवर चांगली सूट दिली आहे. जानेवारीमध्ये, कंपनीने आपल्या Tata Nexon EV Prime वर 50,000 रुपयांपर्यंत सूट दिली होती आणि Nexon इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर 85,000 हजार रुपयांपर्यंतची सूटही दिली होती.
डिस्काउंट देण्यामागे हे आहे महत्वाचे कारण
सरकार देशात इलेक्ट्रिक (Electric Vehicle) आणि हायड्रोजन वाहनांच्या जाहिरातींना तसेच विक्रीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतेय. जेणेकरून प्रदूषणाच्या गंभीर समस्येचा सामना करणार्या जवळजवळ सर्व मोठ्या शहरांना हळूहळू थोडा दिलासा मिळू शकेल आणि पेट्रोल डिझेलसारख्या पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व हरित ऊर्जेकडे कमी करता येईल.
त्यामुळे तेथील इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन बनवणाऱ्या कंपन्यांना सरकार प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज (PLI) योजनेअंतर्गत आर्थिक मदत करत आहे. यामुळे टाटा आपल्या ग्राहकांना हा फायदा देऊन आपल्या इलेक्ट्रिक कारची विक्री वाढवू इच्छित आहे. (Discount Offer)