Tata टेक्नॉलॉजीत मारणार मोठी बाजी! iPhone 15 ने मोबाईल विश्वात ठेवणार पाऊल, वाचा सविस्तर l tata group assemble apple iphone 15 in india a big step in mobile world modi made in india step | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Group Entry In Mobile World

Tata टेक्नॉलॉजीत मारणार मोठी बाजी! iPhone 15 ने मोबाईल विश्वात ठेवणार पाऊल, वाचा सविस्तर

Tata Group Entry In Mobile World : टाटा समुह हा भारतातील विश्वास पात्र असा एक समुह असून आता हा समुह टेक्नॉलॉजीत मोठी बाजी मारणार आहे. टाटा समुह कारच्या वेगवेगळ्या पार्ट्सच्या निर्मितीच्या कामात हळू हळू सहभाग घेत होताच. आता मात्र समुहाने मोबाईल विश्वात उतरण्याचा निर्मण घेतलाय. याची सुरुवात iPhone 15 च्या जबरदस्त लाँचिंगने होईल. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

टाटा समूह भारतात iPhone 15 च्या असेंब्लिंगचा करार करत आहे. म्हणजे यावेळी Apple iphone 15 पूर्णपणे स्वदेशी असेल, ज्यामध्ये टाटांचा सकारात्मक सहभाग दिसून येईळ. पंतप्रधान मोदींनी मेड इन इंडियाच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल आहे.

Tata Group Entry In Mobile World

Tata Group Entry In Mobile World

आता चीनवर फासरे अवलंबून राहायचे नाही असे अॅप्पल कंपनीने आधीच स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे अॅप्पल कंपनीने आती चीनऐवजी भारताची निवड केली आहे. याचं कारण म्हणजे आयफोन विक्रीसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. सोबतच भारत हळूहळू टेक्नॉलॉजीच्या दिशेने विकसित होतोय.तसेच भारतात लेबर कॉस्ट चीनच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे भारतात आयफोनच्या असेंब्लिंगचा दुप्पट फायदा होणार आहे.

टाटा आयफोन बनवणारी चौथी कंपनी ठरेल

TrendForce च्या अहवालानुसार, टाटा समूह Apple चे अपकमिंग मॉडेल iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात असेंबल करेल. याआधी फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि लक्सशेअर सारख्या कंपन्या भारतात आयफोन असेंबल करत होत्या. पण आता टाटा समूहसुद्धा या शर्यतीत सामील झाला आहे. टाटा समूह भारतात आयफोन बनवणारी चौथी कंपनी ठरणार आहे. टाटा समूहाने विस्ट्रॉनची इंडियन प्रोडक्शन लाइन विकत घेतली आहे, जिथे आयफोन 15 सीरीज असेंबल केली जाईल.

कधी होणार iPhone 15 लाँच

अॅप्पल कडून iPhone 15 यावेळी सप्टेंबर महिन्यात लाँच केला जाईल. माहितीसाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone सीरीज लाँच केली जाते.