Tata Harrier : टाटा हॅरियर फेसलिफ्टबद्दल 5 खास गोष्टी, ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Harrier

Tata Harrier : टाटा हॅरियर फेसलिफ्टबद्दल 5 खास गोष्टी, ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत

Tata Harrier : टाटा मोटर्स 2023 च्या सणासुदीच्या काळात आपली पॉवर फुल टाटा हॅरियर फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. या SUV मध्ये बरेच कॉस्मेटिक आणि मेकॅनिकल बदल पाहायला मिळतात. अलिकडच्या काही महिन्यांत त्याची चाचणी होताना आढळून आलंय. 2023 टाटा हॅरियर फेसलिफ्टबद्दल महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

2023 टाटा हॅरियर फेसलिफ्टची किंमत

2023 टाटा हॅरियर फेसलिफ्टची सध्या चाचणी सुरू आहे. टाटा मोटर्स ऑक्टोबर 2023 च्या आसपास 2023 हॅरियर फेसलिफ्ट SUV लाँच करू शकते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या गाडीच उत्पादन सप्टेंबर 2023 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. किंमतीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त किंमत असण्याची शक्यता आहे, बाकीचे अचूक तपशील लॉन्चच्या वेळी कळतील.

2023 टाटा हॅरियर फेसलिफ्ट एक्सटेरियर

फेसलिफ्ट मॉडेल्सच्या बाबतीत, हॅरियरमध्ये बाहेरून काही कॉस्मेटिक बदल दिसतील. नवीन हेडलॅम्प डिझाइन, डीआरएल तसेच नवीन फ्रंट बंपर यांसारखे मोठे बदल होणार आहेत. हे बदल ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या Harrier EV च्या डिझाईन प्रमाणे असतील. साइड प्रोफाईल मुख्यत्वे तेच राहील, अलॉय व्हील्समध्ये नवीन डिझाइन दिसेल. मागील बाजूस एलईडी टेल लॅम्प्स आहेत आणि बूट लिपमध्ये कनेक्टिंग लाइट स्ट्रिप असणे अपेक्षित आहे.

2023 टाटा हॅरियर फेसलिफ्टचे इंटीरियर

इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, हॅरियर फेसलिफ्टला नवीन सेंटर कन्सोल हाऊसिंग, नवीन गियर शिफ्टर आणि ड्राइव्ह मोड रोटरी डायलसह एक नवीन 10.25-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले मिळेल. केबिन लेआउट, स्टीयरिंग व्हील आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर समान राहण्याची शक्यता आहे. याशिवाय टाटा मोटर्स अपडेटेड मॉडेलमध्ये इंटीरियरमध्ये नवीन कलर थीम देऊ शकते.

इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन टाटा हॅरियर फेसलिफ्टला 2.0-लिटर क्रायोटेक डिझेल इंजिन दिले जाईल जे 170 bhp पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करेल. ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल. टाटा हॅरियर फेसलिफ्टमध्ये 1.5L tGDi पेट्रोल इंजिन देखील मिळू शकते.