esakal | झूम : टिगॉर ईव्ही, परवडणारी अन् किफायतशीर!
sakal

बोलून बातमी शोधा

झूम : टिगॉर ईव्ही, परवडणारी अन् किफायतशीर!

झूम : टिगॉर ईव्ही, परवडणारी अन् किफायतशीर!

sakal_logo
By
प्रणीत पवार

जगभरात वाहनांच्या विद्युतीकरणाला प्रचंड गती दिली जात आहे. भारतातही त्या दृष्टीने प्रयत्न होत असून, विविध कार कंपन्या इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर उतरवत आहेत. यात टाटा कंपनीने आघाडी घेतली असून, ‘नेक्सॉन’नंतर ‘टिगॉर’ ही दुसरी इलेक्ट्रिक कार टाटाने बाजारात नुकताच दाखल केली. टिगॉर ईव्ही किंमत आणि प्रवासाचा खर्च या दोन्हींच्या दृष्टीने परवडणारी कार ठरण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर कंपनीने ‘नेक्सॉन ईव्ही’ या कॉम्पॅक्ट एसयूव्हीनंतर ‘टिगॉर ईव्ही’ ही सेदान कार ऑगस्टअखेर बाजारात दाखल केली. नुकताच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टिगॉर इव्ही चालवण्याचा अनुभव घेतला. पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहनाचे स्टेअरिंग हातात घेतले. परंतु, प्रत्यक्ष राईड करताना इलेक्ट्रिक नव्हे तर ‘आयसीई’ कार चालवत असल्याचा फिल आला. बाजारातील स्पर्धा पाहून टाटाही आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त कार बाजारात आणत असल्याची प्रचितीही या निमित्ताने आली.

नेक्सॉन इव्हीप्रमाणे टिगॉर इव्हीमध्येही ‘झिप्ट्रॉन’ हे टाटाने स्वतः विकसित केलेले तंत्रज्ञान वापरले आहे. या तंत्रज्ञानामध्ये मॅग्नेट एसी मोटर बसवण्यात आली असून, तिची गरजेनुसार सर्वोत्तम कामगिरी बजावण्याची क्षमता आहे. कारची बॅटरी चार्ज करण्यासाठी झिप्ट्रॉन स्मार्ट रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा वापर करते. याद्वारे तीव्र उतारावर कारचे एक्सिलरेशन सोडल्यानंतर ऑटोमेटिक ब्रेक घेऊन बॅटरी चार्जिंग होण्यात मदत होते. टिगॉर ईव्हीची रचना ही टेक्‍नॉलॉजी, कम्‍फर्ट व सेफ्टी या तीन संकल्पनांवर आधारलेली असून, प्रत्यक्ष कार चालवताना याची अनुभूती येते. टिगोरमध्ये २६ किलोवॅटचे लिक्विड-कूल्‍ड, हाय एनर्जी डेन्सिटी आणि आयपी ६७ रेटेड बॅटरी पॅक व मोटर पॉवर दिल्याने ही कार कोणत्‍याही रस्त्यावर आरामदायी प्रवासाची खात्री देते.

टिगॉरचे स्टेअरिंग हाताळणीस जास्त कष्ट पडत नाहीत. कारमध्ये ड्राईव्ह आणि स्पोर्ट्स असे दोन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. स्पोर्ट्स मोडमध्ये ड्राईव्ह करताना कारला अधिक ताकदही मिळते. कारमध्ये ३१६ लिटरचा बूटस्पेस दिला असून, आसनक्षमता आरामदायी आहे. टिगॉर सिग्नेचर टेल ब्ल्यू आणि डेटोना ग्रे या रंगात उपलब्ध आहे. या कारचे एक्स ई, एक्स एम, एक्स झेड प्लस हे तीन व्हेरिएंट असून, किंमत अनुक्रमे ११.९९ लाख, १२.४९ लाख, १२.९९ लाख रुपये आहे.

फीचर्स आणि सुरक्षा

इलेक्ट्रिकली एडजस्‍टेबल व फोल्‍डेबल ओआरव्‍हीएम, स्‍मार्ट की सोबत पुश बटन स्‍टार्ट, पोर्टेबल चार्जिंग, ७ इंची टचस्क्रीन इंन्फोटेनमेंट, हरमन ऑडियो सिस्टम, ऑल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आय आरए कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, टाटाचे ‘झेड’कनेक्ट आदी ३० हून अधिक फीचर्स आहेत. सुरक्षेच्या बाबतीत ही कारही सरस ठरते. टिगॉर ईव्‍हीला ‘जीएनसीएपी’कडून ४ स्टार रेटिंग मिळाले आहे. त्याशिवाय या कारमध्ये दोन एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशनसह (ईबीडी) अॅन्टिलॉक ब्रेकिंग सिस्टिम, कॉर्नर स्टेबिलीटी कंट्रोल हे सुरक्षात्मक फीचर्ससह रिअर पार्क असिस्ट देण्यात आले आहे.

टिगॉर

मोटर : ७४ बीएच पॉवर, १७० एनएम टॉर्क

बॅटरी पॅक : २६ किलोवॅट हाय एनर्जी

डेन्सिटी लिथियम-आयन बॅटरी

रेंज : २६० किलोमीट

चार्जिंग : होम सर्किट - ८.४५ तास,

फास्ट चार्जिंग - एक ते दीड तास

नेक्सॉन

मोटर : १२७ बीएच पॉवर, २४५ एनएम टॉर्क

बॅटरी पॅक : ३०.२ किलोवॅट हाय एनर्जी

डेन्सिटी लिथियम-आयन बॅटरी

रेंज : ३१२ किलोमीट

चार्जिंग : होम सर्किट - ८ तास,

फास्ट चार्जिंग - एक तास

loading image
go to top