Tata Motors : टाटाच्या या 7 गाड्या होणार लाँच, तुमची फेव्हरेट कार कोणती आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Motors

Tata Motors : टाटाच्या या 7 गाड्या होणार लाँच, तुमची फेव्हरेट कार कोणती आहे?

Tata Motors : टाटा मोटर्स यावर्षी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक आणि सीएनजी कारसह इतरही कार लॉन्च करणार आहे. Altroz CNG चं बुकिंग देखील सुरु झाले आहे. Altroz CNG ची विक्री या महिन्यात म्हणजेच मे 2023 मध्ये होणार आहे.

Tata Nexon Facelift देखील त्याच्या अंतिम टप्प्यात आहे आणि याचं वितरण ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. कंपनी Tata Altroz Racer Edition आणि Tata Punch EV आणण्याच्या तयारीत आहे.

Tata Altroz CNG

Tata Altroz हॅचबॅकची CNG कार 4 ट्रिम्स XE, XM+, XZ आणि XZ+ मध्ये येईल. इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन सर्व प्रकारांमध्ये दिले जाईल, ज्याला पॉवर देण्यासाठी ट्विन-सिलेंडर सीएनजी किट दिले जाईल.

CNG मोडमध्ये, कार 77 BHP पॉवर आणि 97 NM टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. Tata Altroz CNG ला 30-लिटरच्या दोन CNG टाक्या मिळतात, ज्या बूट फ्लोअरच्या खाली ठेवल्या जातात. कारच्या टेलगेटवर 'iCNG' बॅज देण्यात आला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, पेट्रोल मॅन्युअल मॉडेलपेक्षा ही कार 90,000 रुपयांनी महाग असण्याची शक्यता आहे.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट

टाटाची सर्वाधिक विक्री होणारी SUV Tata Nexon आगामी काळात कॉस्मेटिक आणि फीचर अपग्रेडसह एंट्री करेल. सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीचे डिझाइन बदल आणि अंतर्गत भाग या वर्षीच्या ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केलेल्या कर्व्ह संकल्पनेवर आधारित असतील.

आतील बाजूस नवीन टू-स्पोक, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, टच पॅनेलसह कस्टमाइज्ड सेंटर कन्सोल आणि HVAC कंट्रोल्ससाठी टॉगल स्विच, नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नवीन जांभळ्या सीट अपहोल्स्ट्री असेल. इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात नवीन 1.2L टर्बो पेट्रोल इंजिन असेल जे 125 bhp पॉवर आणि 225 Nm टॉर्क जनरेट करेल. याशिवाय ही कार 1.5L डिझेल इंजिनसह देखील उपलब्ध असेल.

टाटा पंच सीएनजी

टाटा पंच सीएनजी प्रथम 2023 ऑटो एक्सपोमध्ये अल्ट्रोझ सीएनजी सोबत प्रदर्शित करण्यात आली होती. Altroz CNG प्रमाणे, यात ट्विन-सिलेंडर CNG सेटअपसह 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते. मायक्रो एसयूव्हीची सीएनजी आवृत्ती केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केली जाईल.

सीएनजी मॉडेल 77 बीएचपी पॉवर आणि 97 एनएम टॉर्क जनरेट करते. त्यामुळे ते नेहमीच्या पेट्रोल मॉडेलपेक्षा थोडे कमी पॉवरफुल असेल. याला बूट फ्लोअरच्या खाली प्रत्येकी 60 लिटरच्या दोन मोठ्या CNG टाक्या मिळतात. डिझाइनच्या बाबतीत, पंच सीएनजीला आयसीएनजी बॅज मिळतो जो पेट्रोल मॉडेलपेक्षा वेगळा आहे.

Tata Altroz Racer Edition

2023 Auto Expo मध्ये Tata Altroz Racer Edition प्रदर्शित करण्यात आली होती, जी Tata Altroz ची स्पोर्टियर आणि अधिक शक्तिशाली व्हर्जन आहे. मॉडेलला नवीन 10.25-इंचाची टचस्क्रीन मिळते जी हॅरियर आणि सफारी SUV मध्ये ही दिली जाईल. यात व्हॉईस असिस्ट आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सनरूफसह नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळतो.

हॅचबॅकला काही स्पोर्टी डिझाईन बिट्ससह ऑल-ब्लॅक ट्रीटमेंट मिळते. अल्ट्रोज रेसरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे 1.2-लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन जे 120bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. लॉन्च झाल्यावर, ते Hyundai i20 N लाइनशी स्पर्धा करेल. ही कार 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह मिळेल.

टाटा हॅरियर/सफारी फेसलिफ्ट

Tata Harrier आणि Safari SUV चे नवीन मॉडेल 2023 च्या सणासुदीच्या आधी येतील. दोन्ही मॉडेल्समध्ये नवीन 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, ज्याचा इंटरफेस चांगला असल्याचा दावा केला जातोय. कारचा डॅशबोर्ड हा थीम आणि टेक्सचरसह येण्याची अपेक्षा आहे.

अहवालानुसार 1.5-लिटर, 4-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन सादर मिळण्याची शक्यता आहे. 2023 टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्टमध्ये 170 bhp पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट होईल. दोन्ही SUV चे नवीन मॉडेल सप्टेंबर 2023 पासून बाजारात येण्याची शक्यता आहे.

टाटा पंच ईव्ही

टाटा पंच ईव्ही या वर्षाच्या शेवटी येऊ शकते. ही देशातील सर्वात लोकप्रिय टाटा कारपैकी एक आहे. पंच इलेक्ट्रिक नवीन सिग्मा आर्किटेक्चरवर आधारित असेल, जो एक अल्फा प्लॅटफॉर्म आहे. इलेक्ट्रिक मायक्रो एसयूव्हीचा पॉवरट्रेन सेटअप टाटाच्या सध्याच्या ईव्हीवरून घेण्यात आला आहे