टाटाच्या या वाहनांवर मिळतेय भरघोस सूट; काय आहेत ऑफर, जाणून घ्या

Tata Tiago
Tata Tiago

भारतातील कार विक्रीच्या बाबतीत, टाटा मोटर्सच्या वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे, दरम्यान टाटाची विक्री इतर कंपन्यांच्या तुलनेत नेहमीच जास्त राहिली आहे. तुम्ही देखील जर का येत्या काळात टाटाची एखादी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, टाटा मोटर्स सध्या त्यांच्या अनेक मॉडेल्सवर ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत किती सूट मिळेल ते आज आपण पाहाणार आहोत.

होळीच्या निमित्ताने सवलत मिळणार

जेव्हा जेव्हा सणाचा हंगाम येतो तेव्हा अनेक वाहन कंपन्या आपापल्या शोरूममध्ये अनेक आकर्षक ऑफर्स देतात, दरम्यान टाटा मोटर्स देखील आपल्या ग्राहकांसाठी होळीच्या या शुभ मुहूर्तावर खास ऑफर देत आहे. कंपनीच्या डीलरशिप आणि रेंजच्या माध्यमातून ऑफर केल्या जाणार्‍या या सवलतींमध्ये Tiago, Tigor, आणि Nexon पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट आणि हॅरियर आणि सफारी यांचा समावेश आहे.

Tata Tiago
108MP कॅमेरासह रेडमीचे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉंच, पाहा डिटेल्स

या वाहनांवर कोणतीही सूट मिळणार नाही

Tata Motors त्यांच्या इलेक्ट्रिक कारवर कोणतीही ऑफर देत नाही, ज्यात Tata Tigor EV आणि Nexon EV यांचा समावेश आहे. त्याच वेळी, कंपनी टाटाच्या नवीन पंच आणि अल्ट्रोजमध्ये देखील कोणतीही सूट देत नाही.

दरम्यान टाटा टियागो हॅचबॅक (MY 2022) चे खरेदीदार मार्च 2022 पर्यंत 10,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळवू शकतात. XZ, XZA, XZ+, XZA+ पेट्रोल व्हेरियंटवरही ही ऑफर दिली जात आहे. Tata Tigor (MY 2021) वर 10,000 रुपये रोख सवलत, 15,000 रुपये एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफीट देत आहे.

Tata Tiago
Maruti ची आणखी एक CNG कार लॉंच, देते जबरदस्त मायलेज; पाहा किंमत

Tata Tiago प्रमाणे, Tata Tigor सब-कॉम्पॅक्ट सेडान (MY 2022) XZ, XZA, XZ+, XZA+ पेट्रोल व्हेरियंटमध्ये 10,000 रुपये रोख सवलत, 10,000 रुपये एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपये कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे. टिगोर (MY 2021) मध्ये, या सवलती अनुक्रमे 10,000 रुपये, 15,000 रुपये आणि 3,000 रुपये आहेत.

Tata Tiago
Tata Nexon चे 4 नवीन व्हेरिएंट लॉंच, मिळणार हे मस्त फीचर्स, पाहा किंमत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com