टाटांनी भारतात आणलंय हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान

टाटा मोटर्सने हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या विकासामध्ये आघाडी घेतली आहे.
Hydrogen Bus
Hydrogen Bus Sakal

मुंबई : भारत सरकारने 2030 पर्यंत अर्थव्यवस्थेद्वारे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाची तीव्रता 45 टक्क्यांनी कमी करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान हा जीवाष्म इंधनांच्या जागी वापरण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून उदयाला येत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी हायड्रोजन हा ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरण्यासाठी देशभरातील उद्योग आणि क्षेत्रे सध्या प्रयत्नशील असताना, टाटा मोटर्सने लक्षणीय पावले टाकली आहेत आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या विकासामध्ये आघाडी घेतली आहे, अशी माहिती टाटा मोटर्सचे अध्यक्ष आणि सीटीओ राजेंद्र पेटकर यांनी दिली आहे. (Tata Motors Hydrogen Fuel Cell Technology )

Hydrogen Bus
'अखेर पीडिता गोव्यात सापडली.. इंजेक्शन देऊन नेण्यात आलं'

टाटा मोटर्सने या तंत्रज्ञानासाठी पुणे येथे समर्पित लॅब स्थापन केली आहे. यापूर्वी ही लॅब बेंगळुरू येथे होती. तेथे कंपनी इस्रो व भारतीय विज्ञान संस्थेच्या (IIAC) सहयोगाने या तंत्रज्ञानावर काम करत होती. टाटा मोटर्सने संबंधित सुरक्षा प्रणालीसह हायड्रोजन हॅण्डलिंग आणि ऑनबोर्ड स्टोरेज क्षमताही विकसित केली असून, फ्युएल सेल बसेसच्या चाचण्या घेण्यासाठी कंपनीतर्फे साणंद येथे समर्पित हायड्रोजन डिस्पेन्सिंग स्टेशन व टेस्ट ट्रॅक उभारला आहे. तसेच जून 2021 मध्ये, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने, (आयओसीएल) 15 हायड्रोजनवर आधारित प्रोटोन एक्स्चेंज मेम्ब्रेन (पीईएम) फ्युएल सेल बसेसच्या पुरवठ्याचे कंत्राट कंपनीला दिले आहे.

Hydrogen Bus
आता पेट्रोल-डिझेल चिंता सोडा, Renault घेऊन येतेय हायड्रोजन कार

“उद्योगक्षेत्रातील आद्य कंपनी म्हणून टाटा मोटर्स, स्वच्छ व पर्यावरणपूरक पर्यायांच्या दिशेने चाललेल्या स्थित्यंतराच्या अग्रभागी आहे आणि इंजिनीअरिंग रिसर्च सेंटरने (ईआरसी) गेल्या अनेक वर्षांपासून फ्युएल सेल तंत्रज्ञानावर एकाग्रतेने लक्ष दिले आहे. शून्य कार्बन उत्सर्जन व शाश्वततेची उद्दिष्टे गाठण्याची क्षमता हायड्रोजनमध्ये आहे याची आम्हाला खात्री आहे आणि या क्षेत्रात आम्ही करत असलेल्या प्रयत्नांमुळे भविष्यकाळात हायड्रोजन फ्युएल सेल वाहनांसाठी पसंतीचा पर्याय होऊ असा विश्वासही आम्हाला वाटतो.” असे पेटकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com