Tata Nexon ला मिळणार नवा अवतार, जाणून घ्या डिझाईनपासून इंजिनपर्यंतचे सर्व डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Nexon

Tata Nexon ला मिळणार नवा अवतार, जाणून घ्या डिझाईनपासून इंजिनपर्यंतचे सर्व डिटेल्स

Tata Nexon ही सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. अजूनही यात काही बदल केले नसले तरी ही सर्वाधिक खपाची गाडी आहे. आणि हीच वाढलेली मागणी पाहता टाटा मोटर्सने या एसयूव्हीचं नवं मॉडेल आणण्याची तयारी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने यासाठी टेस्ट सुरू केली आहे.

या वर्षाच्या सुरूवातीलाच नवीन Tata Nexon ची टेस्ट राईड सुरू असल्याचं दिसलं होतं. मॉडेल पूर्णपणे झाकलेले असले तरी बरेच फीचर्स समोर आले आहेत. नवीन Nexon SUV मध्ये काय खास असेल ते जाणून घेऊया …

2024 टाटा नेक्सॉन एक्सटीरियर

लीक फोटोनुसार, नवीन Tata Nexon पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश असेल. यात नवीन डिझाइन फ्रंट ग्रिल आणि बंपर असेल. यावर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये दाखवलेल्या Tata Curvv प्रमाणे, नव्या जनरेशनची Nexon SUV ही कनेक्टेड LED लाइट बारसह सादर केली जाऊ शकते. तसेच गाडीच्या टेललॅम्प क्लस्टर्समध्ये देखील बदल दिसू शकतो.

Tata Nexon चे इंटिरियर

नवीन Tata Nexon च्या इंटीरियरमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. आगामी Subcompact SUV ला 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 7.0-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला जाऊ शकतो. नवीन 2-स्पोक स्टीयरिंग व्हील देखील देण्याची योजना असू शकते. याशिवाय कारमध्ये वेंटिलेटेड सीट्स, फॅक्टरी फिट इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिक एसी युनिट आणि 6 एअरबॅग्ज दिल्या जाऊ शकतात.

2024 Tata Nexon इंजिन

2024 Tata Nexon साठी कंपनीचे 1.2L टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन वापरले जाऊ शकते. हे इंजिन 125bhp पॉवर आणि 225Nm पीक टॉर्क जनरेट करेल. टाटा मोटर्सने 2023 दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये त्यांच्या दोन नवीन टर्बो-पेट्रोल इंजिनचे अनावरण केले होते. SUV चे नवीन जनरेशन मॉडेल 1.5L डिझेल इंजिनसह देखील उपलब्ध आहे, हे इंजिन 110bhp पॉवर आउटपुट देते. सध्याच्या गाडीमध्ये नवीन इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑप्शन मिळू शकतात.

2024 Tata Nexon ची किंमत

2024 Tata Nexon च्या लॉन्च टाइमलाइनबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. रिपोर्टवर विश्वास ठेवायचा झाल्यास नवीन जनरेशनची Nexon 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर, कॉस्मेटिक आणि फीचर अपग्रेड्समुळे एसयूव्हीचे नवीन मॉडेल अधिक महाग असेल. सबकॉम्पॅक्ट SUV मॉडेल लाइनअप सध्या 7.80 लाख ते 14.35 लाख किंमतीच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.