Tech Tips : फोनमधून लॅपटॉपमध्ये फोटो, व्हिडिओ ट्रान्सफर करण्याचा Best Formula | Tech Tips : how to transfer photos and videos from laptop to phone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tech Tips

Tech Tips : फोनमधून लॅपटॉपमध्ये फोटो, व्हिडिओ ट्रान्सफर करण्याचा Best Formula

Tech Tips : सध्या स्मार्टफोन हे ६४ जीबी, १२८ जीबी स्टोरेजसह येतात. फोनमध्येच जास्त स्टोरेज उपलब्ध असल्याने व्हिडिओ, फोटो व इतर फाइल्स सेव्ह करणे सहज शक्य होते. परंतु, एवढे स्टोरेज देखील अनेकदा कमी पडते. अशावेळी लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर डेटा ट्रान्सर करावा लागतो.

अनेकांना फोनमधून लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरवर डेटा कसा ट्रान्सफर करायचा हे माहित नसते. मात्र, आम्ही तुम्हाला सोपी प्रोसेस सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज फोनमधील डेटा लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.

यूएसबी (USB)

यूएसबीच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचा डेटा लॅपटॉपमध्ये सहज शेअर करू शकता. फक्त फोटोच नाही तर यूएसबीच्या मदतीने तुम्ही इच्छित असल्यास व्हिडिओही शेअर करू शकता. आपण डेटा केबल म्हणून मोबाइल चार्जरसह केबल देखील वापरू शकता. सर्वप्रथम फोन आणि लॅपटॉप युएसबी केबलला कनेक्ट करायचा आहे, त्यानंतर फोटो व्हिडिओ सिलेक्ट करून शेअर करायचा आहे.

ओटीजी ट्रान्सफर (OTG Transfer)

लॅपटॉपमधून फोनमध्ये फोटो आणि व्हिडिओ कसे ट्रान्सफर करावे. ओटीजी ही एक केबल आहे ज्याच्या मदतीने युजर स्मार्टफोनवरील दुसरे डिव्हाइस कनेक्ट करू शकतो. याद्वारे तुम्ही सहजपणे डेटा शेअर करू शकता. सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये ओटीजी अॅडॉप्टरच्या मदतीने पेन ड्राइव्ह संलग्न करावा लागेल. मोबाइलच्या सेटिंग्जमधून ओटीजी ऑप्शन इनेबल करावा लागेल. यानंतर तुम्ही सर्व फोटो आणि व्हिडिओ सहज ट्रान्सफर करू शकता.

क्लाउड ड्राइव (Cloud Drive)

डेटा ऑनलाइन क्लाउड ड्राइव्हमध्ये स्टोर करणे एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुम्ही कोठेही व कधीही डेटा अ‍ॅक्सेस करू शकता. काही मोबाइल कंपन्या देखील यूजर्सला ऑनलाइन डेटा सिंक करण्याचा पर्याय देतात. तुम्ही गुगल ड्राइव्ह, गुगल फोटोचा देखील वापर करू शकता. यासाठी गुगल ड्राइव्हवर जी-मेलने साइन अप करावे लागेल. तुम्ही एका क्लिकवर डेटा ट्रान्सफर आणि अ‍ॅक्सेस करू शकता.

जून्या फोनमधून Whatsapp Chat नव्या फोनमध्ये कसे घ्यावे

अँड्रॉयड डिव्हाईससाठी

आपल्या नवीन फोनमध्ये जुन्या फोनमधील चॅटिंग ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी जुन्या फोनमधील व्हॉट्सअॅप उघडावे लागेल. यासाठी स्क्रीनवर सर्वात वर दिलेल्या उजव्या बाजुला ३ डॉट्सवर जावे लागले.

  1. Settings मध्ये जा. त्यानंतर Chats वर क्लिक करा

  2. त्यानंतर Chats backup वर टॅप करा.

  3. त्यानंतर तुम्ही चॅट्स ला बॅकअप करण्यासाठी मॅन्यूअली किंवा ऑटोमॅटिकली (weekly, monthly etc) चा पर्याय निवडू शकता.

iPhones साठी

  • आपल्या Apple ID मध्ये जा आणि iCloud ला टर्न ऑन करा.

  • आता WhatsApp उघडा आणि Settings मध्ये जा

  • आता यानंतर Chats वर क्लिक करा त्यानंतर पुन्हा Chat Backup वर टॅप करा. या ठिकाणी तुम्ही मॅन्यूअली किंवा ऑटोमॅटिकली बॅकअप निवड करू शकता. तुम्हाला व्हिडिओचा समावेश करायचा आहे की नाही हा पर्याय मिळेल.

  • आता तुम्ही नवीन डिव्हाईसवरील व्हॉट्सअॅपमध्ये जा. त्याठिकाणी iCloud वरून जुनी चॅटिंग रिस्टोर करण्यासाठी विचारले जाईल.