Tech Tips : चुकीच्या UPI आयडीवर पेमेंट केले? पैसे परत मिळण्यासाठी हे काम लगेच करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tech Tips

Tech Tips : चुकीच्या UPI आयडीवर पेमेंट केले? पैसे परत मिळण्यासाठी हे काम लगेच करा

Tech Tips : बऱ्याचदा आपण दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी UPI द्वारे पेमेंट करत असतो. पण कधीकधी घाईगडबडीत किंवा चुकून काही लोक चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्स्फर करतात. अशावेळी काय करायचं अपल्याला समजत नाही.

UPI अॅप सपोर्टला ताबडतोब माहिती द्या...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, युजरने सर्वात पहिल्यांदा या प्रकरणाचा रिपोर्ट पेमेंट सेवा प्रदात्याला द्यावा. तुम्हाला GPay, PhonePe, Paytm किंवा UPI अॅपच्या कस्टमर केअर सपोर्टला कॉल करून समस्येची तक्रार करावी लागेल. तुम्ही तुमचा प्रोब्लेम फ्लॅग करू शकता आणि परतावा मागू शकता.

RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही UPI ID द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर तुम्हाला त्या अॅपच्या (GPay, PhonePe, Paytm) ग्राहक सेवा सपोर्टला माहिती द्यावी लागेल. इथेही तुम्हाला तुमचा प्रोब्लेम फ्लॅग करून परतावा मागावा लागेल.

NPCI पोर्टलवर तक्रार कशी करावी

• तुम्ही ज्या UPI अॅपद्वारे पेमेंट केले आहे त्याचे कस्टमर केअर तुम्हाला मदत करत नसेल, तर तुम्हाला NPCI पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवावी लागेल.

• सर्वप्रथम, NPCI च्या अधिकृत साइटवर जावे लागेल.

• यानंतर What we do टॅबवर टॅप केल्यानंतर तुम्हाला UPI वर क्लिक करावे लागेल.

• यानंतर, Dispute Redressal Mechanism पर्याय निवडा.

• तक्रार विभागात, तुम्हाला व्यवहाराशी संबंधित तपशील जसे की UPI ट्रान्झॅक्शन आयडी, ट्रान्सफर केलेली रक्कम, व्हर्च्युअल पेमेंट पत्ता, मोबाइल नंबर, व्यवहाराची तारीख आणि ईमेल आयडी एंटर करावा लागेल.

• यानंतर, तुम्हाला कंप्लेंट करण्यामागील कारण निवडावे लागेल, जसे की Incorrectly transferred to another account.

• सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची तक्रार नोंदवण्यासाठी सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

बँकेशी संपर्क साधा

तुम्हाला तुमच्या तक्रारीवर काहीच उत्तर मिळालं नाही तर अशा स्थितीत तुम्ही पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँक आणि ज्या बँकेत पैसे ट्रान्सफर केले गेले त्या बँकेकडे तक्रार करा.