
Technology Tips : Ola-Ather ला घाम फुटला, हिरो घेऊन येणार इलेक्ट्रिक स्कूटरची नवी रेंज
Hero Electric Scooter : देशातील सर्वात मोठी टू व्हीलर निर्माती Hero MotoCorp पुढच्या 18-24 महिन्यांत त्यांच्या इलेक्ट्रिक टू व्हिलरची रेंज वाढवण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी कस्टमर सेगमेंट मध्ये डिमांड पूर्ण करणार आहे. कंपनीने याआधी दिल्ली, बेंगळुरू आणि जयपूर या शहरात विडा ब्रँड अंतर्गत इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू केली आहे.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये Ola, Okinawa आणि Ather सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी Hero ने मोठ्या योजना आखल्या आहेत. सध्या विडा इलेक्ट्रिक स्कूटर दिल्ली, बेंगळुरू आणि जयपूर या तीन शहरांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. मात्र, कंपनी आता अनेक नवीन शहरांमध्ये एन्ट्री मारणार आहे. Hero MotoCorp हेड, इमर्जिंग मोबिलिटी बिझनेस युनिटचे (EMBU) स्वदेश श्रीवास्तव म्हणाले की, 2024 च्या आर्थिक वर्षात कंपनी बाजारात मोठ्या प्रमाणावर आपलं प्रोडक्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे.
यांच्याशी आहे स्पर्धा...
Hero MotoCorp ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये VIDA V1 इलेक्ट्रिक स्कूटर प्रो आणि प्लस या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली होती. आंध्र प्रदेशातील चित्तूर प्लांटमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरचं उत्पादन सुरू आहे. Hero MotoCorp क्या इलेक्ट्रिक स्कूटरची सपर्धा बजाज चेतक, TVS iQube, Ather Energy, Hero Electric आणि Ola Electric सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी आहे.
कंपनीचा विस्तार..
श्रीवास्तव म्हणाले की, कंपनी या आर्थिक वर्षात बाजारात नवीन ब्रँड प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरली असून आता पुढील वर्षी नव्या मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या तिमाहीत आणखी काही शहरांमध्ये बाईक लॉन्च करणार आहोत. त्यानंतर पुढील वर्षी Vida V1 चा देशव्यापी विस्तार करणार आहोत.
इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीत चौपट वाढ...
श्रीवास्तव म्हणाले की, उत्पादनाच्या पोर्टफोलिओच्या बाबतीत आमच्या ब्रँडकडे एक उत्तम योजना आहे. या योजनेत विविध सेगमेंट मधील उत्पादने असतील. देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रचंड वाढ होत आहे. FADA च्या मते, गेल्या वर्षी 6,28,671 युनिट्सची विक्री झाली. 2021 मध्ये हीच विक्री 1,55,422 इतकी होती.