
टेलिग्रामची प्रीमियम सेवा लाँच, मिळणार हे फायदे
७०० दशलक्ष वापरकर्ते पूर्ण केल्यानंतर लोकप्रिय मेसेजिंग ॲप टेलिग्रामने (Telegram) प्रीमियम सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत टेलिग्राम प्रीमियम वापरणाऱ्या युजर्सना अनेक नवीन फीचर्सचा ॲक्सेस दिला जाईल. (Telegrams premium service launch)
नवीन फीचर्सअंतर्गत ४ GB पर्यंत फाईल अपलोड करता येईल. जलदगतीने डाऊनलोड करता येईल तसेच एक्स्लुझिव्ह स्टिकर्स अशा अनेक सुविधा उपलब्ध असतील. रिपोर्टनुसार, कंपनी (Telegram) यासाठी प्रत्येक महिन्याला ४.९९ डॉलर चार्ज करेल. भारतीय वापरकर्त्यांसाठी याची किंमत काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा: काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; सहाय म्हणाले, मोदी हिटलरप्रमाणे मरतील
४GB पर्यंत फाईल अपलोड करता येईल
टेलिग्रामवर (Telegram) सर्व वापरकर्त्यांसाठी २GB पर्यंत फाईल्स पाठवण्याची सुविधा आधीच उपलब्ध आहे. परंतु, टेलीग्राम प्रीमियम सदस्यांसाठी आता फाईल पाठवण्याची मर्यादा ४GB असेल. या फाईल्स डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रीमियम मेंबरशिपची आवश्यकता असणार नाही.
जलदगतीने डाउनलोड गती
टेलिग्राम प्रीमियम सदस्यांना टेलिग्राम सर्व्हेवर सर्वांत जलद डाउनलोड गती मिळू शकेल. ‘आपण आपल्या अमर्यादित क्लाउड स्टोरेजमध्ये शक्य तितक्या वेगवान नेटवर्कद्वारे सर्वकाही ॲक्सेस करू शकता’ असे कंपनीच्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रीमियम वापरकर्त्यांसाठी याआधीच्या जवळजवळ सर्व मर्यादा वाढवल्या जातील. उदा. टेलिग्राम प्रीमियम ग्राहक १,००० चॅनेल फॉलो करू शकतात. प्रत्येकी २०० चॅट्ससह २० चॅट फोल्डर तयार करू शकतात. कोणत्याही टेलीग्राम ॲपमध्ये चौथे खाते जोडू शकतात. मुख्य यादीमध्ये १० चॅट पिन करू शकतात.
हेही वाचा: अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी; जुलैपासून नोंदणी
व्हॉइस-टू-टेक्स्ट सेवा
टेलिग्राम प्रीमियम वापरकर्ते व्हॉइस नोट्स ऐकण्याऐवजी वाचण्यास प्राधान्य देत असल्यास ते व्हॉइस नोट्स टेक्स्टमध्ये रूपांतरित करू शकतील. याला ते रेटिंग देऊ शकतील, जेणेकरून कालांतरानं यात सुधारणा होईल.
ॲनिमेटेड प्रोफाईल व्हिडिओ
प्रीमियम वापरकर्ते ॲनिमेटेड प्रोफाईल व्हिडिओंमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील, जे सर्व वापरकर्त्यांना दिसू शकेल. सर्व प्रीमियम वापरकर्त्यांना एक प्रीमियम बॅज देखील मिळेल, जो चॅट सूची आणि ग्रुपमधील सदस्य सूचीमध्ये त्यांच्या नावापुढे दिसेल.
Web Title: Telegrams Premium Service Launch
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..