Cars Discontinued : आजपासून या 10 गाड्या होणार डिस्कन्टीन्यू, बघा पूर्ण लिस्ट l these cars will be discontinue from today check whole list | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cars Discontinued

Cars Discontinued : आजपासून या 10 गाड्या होणार डिस्कन्टीन्यू, बघा पूर्ण लिस्ट

Cars Discontinued : कार कंपन्यांनी रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियमांचे पालन करण्यासाठी अनेक मॉडेल्स अपडेट केले आहेत. पण मारुती सुझुकी अल्टो 800 सह काही गाड्या अजून अपडेट झालेल्या नाहीत. त्यामुळे आजपासून या गाड्यांची विक्री बंद होणार आहे.

Tata Altroz ​​Diesel: RDE नियम 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू होतील. याचे पालन करण्यासाठी ऑटो कंपन्यांना सध्याच्या कार अपग्रेड कराव्या लागतील. काही कार अपडेट होणार नसल्यामुळे त्यांची विक्री बंद होतील. 1 एप्रिलपासून बंद होणार्‍या वाहनांमध्ये टाटा अल्ट्रोझ डिझेल सुध्दा आहे.

निसान किक्स : काही कार कंपन्यांना त्यांचे मॉडेल्स अपडेट करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना या गाड्या बंद करणं योग्य वाटलं. जपानी कार कंपनी निसान देखील किक्स मॉडेल बंद करत आहे. आजपासून तुम्ही ही कार खरेदी करू शकणार नाही.

Honda City 4th Gen : 1 एप्रिलपासून कार कंपन्यांना कारचा रिअल टाइम एमिशन डेटा द्यावा लागेल. आणखी एक जपानी कंपनी होंडा देखील काही कारची विक्री बंद करत आहे. लोकप्रिय सेडान कार होंडा सिटीचे फोर्थ जनरेशन मॉडेल बंद करण्यात आले आहे.

Honda WR-V : नवीन नियमांमुळे होंडाची आणखी एक कार बंद होणार आहे. येत्या काळात Honda wR-V खरेदी करता येणार नाही, कारण या कारचं अपडेटेड व्हर्जन येईल की नाही हे स्पष्ट नाही.

Mahindra Marazzo : नवीन उत्सर्जन नियमांचा महिंद्रावरही परिणाम होईल. भारतातील लोकप्रिय SUV कार कंपनी Marazzo SUV बाजारातून बाहेर पडणार आहे. नवीन नियमांमुळे ही शार्क इन्स्पायर्ड कारही बंद होणार आहे.

Mahindra KUV 100 : Mahindra KUV100 भारतीय बाजारपेठेत चांगली कामगिरी करू शकली नाही. RDE आणि BS6 फेज 2 नियमांमुळे या कारच्या विक्रीलाही ग्रहण लागणार आहे. 1 एप्रिलपासून महिंद्राची ही एसयूव्ही कारही बंद होणार आहे.

Mahindra Alturas G4 : महिंद्राची दुसरी कार, Alturas G4 नवीन नियमामुळे बंद होत आहे. कंपनीच्या टॉप एसयूव्हीमध्ये समाविष्ट असलेली एसयूव्ही बाजारात दिसणार नाही.

Maruti Suzuki Alto 800 : भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक असलेल्या Maruti Alto 800 ची विक्रीही बंद केली जात आहे. मारुतीने नवीन नियमांनुसार ही कार अपग्रेड केलेली नाही. ग्राहकांना आता नवीन Alto K10 चा पर्याय उपलब्ध असेल.

Renault Kwid : Renault Kwid हे नाव कार मार्केटमधलं खूप लोकप्रिय नाव आहे. मात्र, ही कारही एप्रिलपासून बंद होणार आहे. Kwid ही भारतातील सर्वात स्वस्त कारांपैकी एक आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख आहे.

Skoda Octavia : युरोपियन कार कंपनी Skoda देखील Octavia sedan बंद करत आहे. कॉम्प्लेटली नॉक-डाउन (CKD) मार्गाने ही कार भारतीय बाजारपेठेत आणण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टाव्हियाची किंमत खूप जास्त होती.