या स्मार्टफोन्सना मिळेल अँड्रॉइड 12 चे पहिले बीटा अपडेट, जाणून घ्या सविस्तर

टेक्नोलॉजी कंपनी Google ने आपल्या I/O 2021 इव्हेंटमध्ये नवीनतम अँड्रॉइड 12 ची बीटा वर्जन लॉन्च केले आहे.
Smatrphone
SmatrphoneGoogle

टेक्नोलॉजी कंपनी Google ने आपल्या I/O 2021 इव्हेंटमध्ये नवीनतम अँड्रॉइड 12 ची बीटा वर्जन लॉन्च केले आहे. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये बरीच नवीन फीचर्स जोडली गेली आहेत. तसेच, नोटिफिकेशन ट्रेपासून प्रायव्हसी सेटिंग्ज सुधारित केल्या आहेत. आज आपण या डिव्हायइसबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्यात लेटेस्ट Android 12 ची बीटा वर्जन उपलब्ध असेल.

पिक्सेल सिरीज डिव्हाइसवर अँड्रॉइड 12 बीटा अपडेट मिळेल

Google Pixel 3

Google Pixel 3 XL

Google Pixel 3A

Google Pixel 3A XL

Google Pixel 4

Google Pixel 4 XL

Google Pixel 4A

Google Pixel 4A 5G

Google Pixel 5

Android 12 बीटा डाउनलोड कसे करावे

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन वापरकर्ते Android 12 ची बीटा आवृत्ती डाउनलोड करू शकतात. याशिवाय फोनच्या सेटिंग्जवर जाऊन युजर्स अँड्रॉइड 12 अपडेट डाउनलोड करू शकतात.

Smatrphone
Youtube चॅनेलचे Subscribers वाढवायचे आहेत? मग फॉलो करा या सोप्या टिप्स

या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 12 बीटा अपडेट मिळेल

Asus ZenFone 8

OnePlus 9

OnePlus 9 Pro

Oppo Find X3 Pro

TCL 20 Pro 5G

Tecno Camon 17

iQoo 7 Legend

Mi 11

Mi 11 Ultra

Mi 11i

Mi 11X Pro

Realme GT

ZTE Axon 30 Ultra 5G

Android 12 ची लेटेस्ट फीचर्स

Chromebook वापरकर्त्यांना Android 12 ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक नवीन फीचर मिळेल. या फीचरद्वारे, वापरकर्ते मोबाइलद्वारे Chromebook अनलॉक करु शकतील. याद्वारे, वापरकर्त्यांना क्रोमबुकमध्ये त्यांच्या फोनबद्दल माहिती मिळेल. याशिवाय गुगल एका टीव्ही अ‍ॅपवरही काम करत आहे, जे अँड्रॉइड टीव्हीची जागा घेईल. तथापि, या अॅपबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही.

Smatrphone
तुमचा स्मार्टफोन चोरी झालाय, हे सरकारी पोर्टल करेल शोधण्यात मदत

मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी

Android 12 ऑपरेटिंग सिस्टम IoT डिव्हाइस कनेक्ट करण्यास सक्षम आहे. वापरकर्ते त्यांची कार अँड्रॉइड ऑटो आणि डिजिटल कार की मदतीन आपला फोन कारशी कनेक्ट करु शकतील आणि NFC च्या मदतीन अनलॉक करु शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com