Fraud : सिक्युरीटीचा बादशाह आयफोन, चोरीला गेला अन् खात्यातून उडाले एवढे लाख; कसे? वाचा सविस्तर l thief robbed iphone pro max from women and stole 8 lakh rupees from account by changing passcode cyber crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

Fraud : सिक्युरीटीचा बादशाह आयफोन, चोरीला गेला अन् खात्यातून उडाले एवढे लाख; कसे? वाचा सविस्तर

Fraud : अॅपलचा आयफोन हा सर्वात सुरक्षित फोन मानला जातो. आणि म्हणूनच आपल्या फोनमधील कुठल्याही माहितीचा कधी गैरवापर होऊ शकत नाही याची यूजर्सनाही खात्री असते. Apple चे स्मार्ट गॅजेट्स अनेक वर्षांपासून अव्वल राहिले आहेत. कदाचित त्यामुळेच अँड्रॉईड फोन हॅकिंग प्रकरणांच्या तुलनेत आयफोन हॅकिंगची प्रकरणं कमी आहेत. मात्र अलीकडेच घडलेल्या घटनेनंतर आता आयफोन यूजर्सनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.

फोनमधील पासकोड हा एक जबरदस्त पर्याय आहे. पासकोड सेट केल्यानंतर, फोन अधिक सुरक्षित होतो. पासकोड उत्तम सुरक्षा प्रदान करतो आणि आयफोनमध्ये डेटा संरक्षण देखील चालू करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमच्या iPhone वर शेअर केलेला पासकोड चोर देखील वापरू शकतात आणि बँकेची ओळखपत्रे चोरू शकतात?

काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

मिडटाउन मॅनहॅटनच्या एका महिलेचा आयफोन एक चोराने चोरी केला. त्यानंतर तिच्या बँक अकाउंटमधून तब्बल 10000$ (आठ लाख) उडवलेत. सूत्रानुसार, महिला एका क्लबमध्ये थँक्सगिव्हींग पार्टीमध्ये असताना एका व्यक्तीने तिचा iPhone 13 Pro Max चोरी केला. फोन चोरी झाल्याच्या अगदी काही वेळानंतर ती तिच्या Apple अकाउंटमध्ये लॉग इन करु शकत नव्हती. अगदी काहीच वेळात तिला तिच्या खात्यातून आठ लाख डेबिट झाल्याचा मेसेजही आला.

आयफोनच्या बाबतीतली ही पहिलीच घटना नव्हती. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत. स्नॅचर काही काळ एखाद्या आयफोन यूजरव लक्ष ठेवतो आणि त्याला पासकोड टाकताना पाहतो. स्नॅचर नंतर फोन चोरतो आणि पासकोड बदलतो आणि ऍपल आयडी बदलतो, जेणेकरून ज्याचा आयफोन हरवला तो परत लॉग इन करु शकणार नाही. त्यानंतर फोनमध्ये सेव्ह केलेल्या ओळखपत्रांच्या मदतीने खात्यात लॉग इन करून पैसे देखील चोरतो.

अॅप्पल आयडी सुरक्षित कशी ठेवाल?

तुमच्या अॅप्पल आयडीसाठी अल्फान्यूमेरिक पासवर्ड वापरा. Apple यूजर्सना 34 वर्णांपर्यंत पासकोड सेट करण्याची परवानगी देते. अशा स्थितीत समोरच्या व्यक्तीला अंदाज येत नाही आणि पाहिल्यानंतरही लक्षात राहणे कठीण होते. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट लॉक आणि फेसआयडी देखील तुम्ही सेट करू शकता. (Fraud)