esakal | फेसबुकवर या गोष्टी चुकूनही करु नका, अकाउंट होऊ शकते ब्लॉक
sakal

बोलून बातमी शोधा

facebook

फेसबुकवर या गोष्टी चुकूनही करु नका, अकाउंट होऊ शकतं ब्लॉक

sakal_logo
By
रोहित कणसे

फेसबुक हा जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जवळपास सगळेच जण आजकाल फेसबुक वापरतात. तसेच दररोज लाखो वापरकर्ते फेसबुकशी कनेक्ट होत आहेत दरम्यान हे वापरकर्ते दररोज अनेक फोटो, व्हिडीओ किंवा इतर माहिती शेयर करत असतात. काहीवेळा काही वापरकर्ते अशा काही गोष्टी शेयर करतात, त्यानंतर त्यांचे खाते ब्लॉक केले जाते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही चूकुनदेखील फेसबुकवर शेअर करायला नकोत, अन्यथा तुमचे अकाऊंटही ब्लॉक केले जाईल.

बंदी असलेल्या वस्तूंची खरेदी

सोशल मीडियात प्लॅटफॉर्म फेसबुकवर नॉन-मेडिकल औषधांपासून ते गांजा विकत घेणे आणि विक्री करण्यास बंदी आहे. तसेच दारूगोळा, बंदूक खरेदी-विक्री करण्यावर फेसबुकने बंदी घातलेला आहे. अशा परिस्थितीत आपण या गोष्टींशी संबंधित एखादी पोस्ट शेयर केल्यास आपले खाते लगेच ब्लॉक केले जाईल. तसेच आपल्याविरूद्ध कठोर कारवाई देखील केली जाऊ शकते.

हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी पोस्ट

एखादी व्यक्ती, गट आणि ठिकाण याविषयी हिंसा पसरवणारी पोस्ट शेयर करणार्‍या वापरकर्त्यांची खाती फेसबुक लगेच ब्लॉक करते. फेसबुकवर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे धमकावले जाऊ शकत नाही. या व्यतिरिक्त, पैशाची मागणी करणे किंवा विशिष्ट शस्त्राचा उल्लेख करणे किंवा फोटो किंवा शस्त्र विक्री करण्याची ऑफर देणे. अशी पोस्ट काढून टाकली जाते सोबतच वापरकर्त्याचे खाते ताबडतोब ब्लॉक केले जाईल.

दहशतवादी कारवाया

दहशतवादी कारवाया जसे की द्वेष पसरवणे, सामुहिक हत्या, मानवी तस्करी, संघटित हिंसा किंवा गुन्हेगारी कृत्य यासारख्या गोष्टींविरोधात फेसबुक लगेच अॅक्शन घेते . अशा राजकारणी लोकांचे समर्थन करणे आणि कौतुक करणाऱ्या सर्व गोष्टी फेसबुक पूर्णपणे काढून टाकते. या व्यतिरिक्त, कोणतीही राजकीय, धार्मिक उद्दीष्टे साध्य करणार्‍या किंवा कोणत्याही सरकारला किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेला धमकावणार्‍या किंवा हिंसक कामे करणाऱ्या शासकीय, अशासकीय संस्था या सगळ्यांना फेसबुक या सर्व गोष्टींसाठी ब्लॉक करते आणि आपल्या अ‍ॅपवरून पूर्णपणे काढून टाकते.

फेसबुक वर इतरांना Poking

जर आपण इतर फेसबुक वापरकर्त्यांना गरजेपेक्षा जास्त पोक करत असाल तर ते ताबडतोब बंद करा. कारण की असे केल्याने आपले फेसबुक खाते देखील ब्लॉक केले जाऊ शकते.