Tips And Tricks : या चार टिप्स वापरून फोनचं स्टोरेज कमी करता येईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tips And Tricks

Tips And Tricks : या चार टिप्स वापरून फोनचं स्टोरेज कमी करता येईल

Tips And Tricks : अनेकदा स्मार्टफोन युजर्स फोनमधील स्टोरेज फुल झाल्याच्या समस्येने त्रस्त असतात. जर तुमच्या फोनमध्ये स्टोरेज कमी असेल किंवा तुमच्या फोनमध्ये स्टोरेज फुल असल्याचं नोटिफिकेशन वारंवार येत असेल तर नक्कीच तुमचा फोन स्लो होईल. आणि मग काम करताना सतत अडथळे येत राहतील. ते येऊ नयेत यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. या टीप्स वापरून तुम्ही फोनमधील स्टोरेजची समस्या सोडवू शकता.

अॅप कॅशे क्लिअर करा

तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या फोनमध्ये अनेक कॅशे फाइल्स साठवलेल्या असतात. फोनचे स्टोरेज भरण्याचे हे एक प्रमुख कारण असते. जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कोणतेही अॅप उघडता तेव्हा अॅपच्या कॅशे फाइल्स तुमच्या फोनमध्ये जमा होऊ लागतात, अशा परिस्थितीत या कॅशे फाइल्स फोनमधून वेळोवेळी क्लिअर केल्या पाहिजेत. असे केल्याने फोनमधील स्टोरेज रिकामे राहील आणि तुम्हाला फोनच्या परफॉर्मन्समध्ये कोणतीही अडचण किंवा समस्या येणार नाही.

क्लाउड स्टोरेज वापरा

जर तुमच्या फोनचे स्टोरेज पुन्हा पुन्हा भरत असेल, तर फोनमधील फोटो आणि व्हिडिओ फाइल्स क्लाउड स्टोरेजमध्ये ट्रान्सफर करणे हा सर्वात चांगला ऑप्शन आहे. त्यामुळे एक फायदा असा होईल की तुमच्याकडे फोन असो किंवा नसो तुम्हाला हे फोटो आणि व्हिडिओ कुठूनही अॅक्सेस करता येतील. दुसरा फायदा असा होईल की तुमची स्टोरेज भरण्याची समस्या दूर होईल.

स्मार्टफोनमधून नको असलेले अॅप्स डिलीट करा

नको असलेल्या अॅप्सचा अर्थ असा आहे की असे अनेक अॅप्स आपल्या फोनमधील जागा अडवून ठेवतात जे आपण कधी वापरतच नाही. अशा परिस्थितीत हे अॅप्स फोनचे स्टोरेज भरण्याचे आणखी एक प्रमुख कारण बनतात. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये जे अॅप्स आहेत ज्याची तुम्हाला गरज नाही आणि नंतर ते तुमच्या फोनमधून अनइंस्टॉल करा.