बॅटरीचे आयुष्य वाढविण्यासाठी 

 Tips to Boost Your Phone's Battery Life
Tips to Boost Your Phone's Battery Life

अनेकदा नेमक्‍या कामाच्या वेळी मोबाईलची बॅटरी डिसचार्ज होते. असा अनुभव खूपवेळा येतो. त्यामुळे बॅटरीचे चार्जिंग अधिक काळ टिकण्यासाठी काय करावे, त्याच्या या टिप्स... 

व्हायब्रेशन्स बंद करा :
बाहेर कुठे कार्यक्रमाला जाताना, मीटिंगमध्ये असल्यावर, क्‍लासरूममध्ये अशा अनेक ठिकाणी आपण सायलेंट मोडचा आणि व्हायब्रेशनच्या फिचरचा वापर करत असतो. पण व्हायब्रेशन मोडमध्ये संपूर्ण फोन व्हायब्रेट होत असतो. त्यामुळे अर्थातच त्याला लागणारी बॅटरीची पॉवरही त्याच प्रमाणात असते. त्यामुळे शक्‍य तिकडेच व्हायब्रेशन मोडचा वापर करा. बाकी ठिकाणी रिंगटोनचा वापर करा. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, बॅटरीची बचत होऊ शकेल. 

न लागणारी ऍप्स बंद करा :
अनेकांना खूप ऍप्स एकत्र उघडून ठेवण्याची सवय असते. एकदा वापर झाल्यावर ते ही ऍप्स बंद करताना दिसत नाहीत. त्यामुळे बॅग्राउंडमध्ये ही ऍप्स चालू राहतात व विनाकारण बॅटरीही खातात. यामध्ये तुम्ही फोन तर वापरत नाही, पण बॅटरी मात्र ड्रेन होत जाते. या ऍप्सकडून मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. त्यामुळे शक्‍यतो वापर झाल्यावर लगेचच ऍप्स बंद करा. यामुळे बॅटरी जास्त चालण्यास नक्कीच मदत होईल. 
जीपीएस बंद करा 

मोठ्या प्रमाणावर बॅटरी खाणाऱ्या ऍप्सपैकी एक हे ऍप आहे. जीपीएस सिस्टीम सतत आपली लोकेशन ट्रॅक करत असते. यामुळे फोनवरून सतत सिग्नलची देवाणघेवाण सुरू असते. त्यामुळे आपोआपच बॅटरी अतिरिक्त वापर होताना दिसतो. मॅप बेस्ड ऍप्स वापरताना किंवा फेसबुकवर चेक-इन्स करताना हे जीपीएसचे फंक्‍शन आपण वापरतो, पण नंतर ते बंद करायचे मात्र विसरून जातो. त्यामुळे शक्‍यतो जीपीएस यंत्रणा बंद असलेलीच बरी! त्यातही फोनची बॅटरी कमी असताना तर याचा वापर टाळा. 
ब्ल्यूटूथ, वायफाय, थ्रीजी/फोरजी बंद ठेवा ः जीपीएससोबतच मोठ्या प्रमाणावर बॅटरी खाणारी ही काही फंक्‍शन्स आहेत. जेव्हा स्मार्टफोन कोणत्याही प्रकारचा सिग्नल शोधत असेल तेव्हा बॅटरी वेगाने डिस्चार्ज होत असते. ब्ल्यूटूथ, वायफायवर वापरली जाणारी डिव्हायसेस किंवा थ्रीजी/फोरजीचे सिग्नल्स ही त्याची काही उदाहरणे. त्यातही रिसेप्शन कमजोर असल्यास जास्त प्रमाणात बॅटरी लागते. कारण अशावेळेस फोन सतत सिग्नल शोधत असतो. त्यामुळे या फंक्‍शन्सचा गरजेनुसारच वापर करा. 

स्क्रीन डिम करा :
स्क्रीनचा ब्राइटनेस जास्त असेल तर बॅटरी पटकन डिस्चार्ज होते. जरी आपण गरजेव्यक्तीरीक्त स्क्रीन बंद ठेवत असलो तरी ब्राइटनेसचा बॅटरीवर चांगलाच फरक पडतो. आजकाल जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये ऑटो ब्राइटनेसचे फिचर असते. त्याचा वापर करा. यामुळे तुमचा स्मार्टफोन बाहेरील लाइटनुसार स्क्रीनचा ब्राइटनेस ऍडजस्ट करतो. यामुळे आपोआपच गरज असेल तेव्हाच हाय ब्राइटनेस राहतो. त्याचा परिणाम बॅटरीच्या चार्जिंगवरही दिसून येतो. काहीजण सतत फोन लोएस्ट ब्राइटनेसवर ठेवताना दिसतात. पण यामुळे डोळ्याला त्रास होण्याची शक्‍यता असते. 

स्क्रीन टाइम आऊटचा वेळ कमी ठेवा 
डिस्प्लेच्या ब्राइटनेससोबतच त्याच्या टाइम आउटचाही मोठा प्रभाव फोनच्या बॅटरीवर होताना दिसतो. स्क्रीनचा टाइम आउट कमी करूनही तुम्ही बॅटरी जास्त काळ चालवू शकता. 

वापर नसताना फोन बंद ठेवा :
दिवसभरातील असा जो वेळ आहे, जेव्हा तुम्ही फोनचा जराही वापर करत नाहीत. त्या वेळेस स्मार्टफोन बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. काहीजण झोपताना फोनही स्लीप मोडवर टाकतात. यामुळे बॅटरी वाचतेही पण काही प्रमाणात वापरली जाते. घरी किंवा ऑफिसमध्ये असताना फोन चार्ज करणेही टाळा. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com