अति पाणी पिणे ठरेल धोकादायक!

सोमवार, 16 एप्रिल 2018

शरीरातील सोडीयमचे प्रमाण योग्य राहावे यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणेही महत्त्वाचे आहे.

हैदराबाद - आता उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण शरीरात घटता कामा नये. डॉक्टर, डायटेशियन  सुध्दा आपल्याला उन्हाळ्यातील आहाराविषयी सल्ले देताना असेच सल्ले देत असतात. पण प्रमाणात पाणी पिणे हेही तितकेच महत्त्वपुर्ण आहे. होय, पाणी पिण्याचेही प्रमाण असावे लागते. 

त्वचा मॉश्चर्यराइझ राहावी, शरीरातील डिहायड्रेशन नीट व्हावे, अन्न नीट पचावे यासाठी पाणी पिणे जितके गरजेचे आहे. तितकेच शरीरातील सोडीयमचे प्रमाण योग्य राहावे यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणेही महत्त्वाचे आहे. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यावे हे अगदी योग्य आणि सर्व शरीरयष्टींना अनुरुप असे प्रमाण आहे. पण यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी प्यायले तर शरीरातील सोडीयमचे प्रमाण कमी होते. रक्तात पाण्याचे प्रमाण जास्त होऊन शरीरात द्रव पदार्थाचा अतिरेक होतो आणि रक्तात असंतुलन निर्माण होते. सोडीयमचे प्रमाण कमी झाल्याने मळमळणे, उलटी होणे, चक्कर येणे, स्नायू मुरडणे आणि सगळ्यात मोठे दुखणे म्हणजे मेंदूवर सूज येणे जी परिणामी जीवास घातक ठरते.

डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या माहितीनुसार, सल्लागार चिकित्सक डॉ. अनिल बालानी यांनी सांगितले आहे की, 'उन्हाळ्यात अडीच ते तीन लिटर पाणी पिणे प्रमाणशीर आहे. पण साध्या शरीरयष्टीसाठी त्यापेक्षा जास्त पाण्याचे सेवन हे घातक आहे. डिहायड्रेशनची समस्या भरपूर पाणी प्यायल्यानेच सुटते असे नाही तर टरबुज, द्राक्षं, केळी, अननस किंवा सिजनल फळे आणि ज्युसचे सेवन करुनही डिहायड्रेशनची समस्या सुटते. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्या लघवीचा रंग कोणता हे बघावे. जर पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर शरीराला आणखी पाण्याची गरज आहे असे समजावे. याचा अर्थ शरीरात सोडीयमचे प्रमाण कमी आहे. जे योग्य प्रमाणात येईपर्यंतच पाणी प्यावे. जर शारीरिक हालचाली वाढल्याने अधिक घाम येत असेल तर शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यासाठी अधिक पाणी आवश्यक आहे.'

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 
  

Web Title: Too Much Water Can Also Intoxicate You