टिकटॉकसारखेच असलेले भारतीय 'टॉप १०' देसी अ‍ॅप्स आले आहेत, त्या अ‍ॅप्स विषयी सविस्तर वाचाच 

प्राजक्ता निपसे
Saturday, 11 July 2020

भारतीय केंद्र सरकारने चायनीजचे ५९ अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. या निर्णयानंतर गुगल प्ले स्टोरवरून टिकटॉक हटवण्यात आले आहे. भारतात आता टिकटॉक कधीच दिसणार नाही, म्हणजे ते इतिहासजमा झाले आहे.

टिकटॉक सारखे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप तुम्हाला हवे असतील तर आता आपल्यासाठी नवीन भारतीय अ‍ॅप्स आले आहेत. मेड इन इंडिया असलेल्या या अ‍ॅप्समध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता. कोणते आहेत हे अ‍ॅप्स जाणून घ्या. 

भारतीय केंद्र सरकारने चायनीजचे ५९ अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. या निर्णयानंतर गुगल प्ले स्टोरवरून टिकटॉक हटवण्यात आले आहे. भारतात आता टिकटॉक कधीच दिसणार नाही, म्हणजे ते इतिहासजमा झाले आहे. टिकटॉक भारतात चालत नसल्याने आता जे टिकटॉकचा वापर करीत होते. त्यांच्यासाठी भारतीय अ‍ॅप्स आले आहेत. आज टिकटॉक सारखीच सुविधा देणारे भारतीय १० अ‍ॅप्स आले आहेत.

टिकटॉकच्या बंदीनंतर भारतीय अ‍ॅप्स वेगाने व्हायरल होत आहेत. आता TikTok चायनीज अ‍ॅप्सच्या यादीत जमा झाला. आजपर्यंत भारतात टिकटॉकचे कोट्यवधी युजर्स होते. जर टिकटॉकच्या बंदीनंतर तुम्हाला टिकटॉक सारखे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप  हवे असतील तर भारतीय अ‍ॅप्स उपलब्ध झालेले आहेत. मेड इन इंडिया असलेल्या या अ‍ॅप्समध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता. तर त्या भारतीय अ‍ॅप्सची हि आहे लिस्ट . 

रिझल (Rizzle)
हे रिझल अ‍ॅप संपूर्णपणे भारतात बनवल्याचा दावा करण्यात येत आहे. ६० सेकंदाचे व्हिडिओ या अ‍ॅपवर बनवले जावू शकतात. हे अ‍ॅप अँड्रॉयड आणि iOS या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. कोलॅब करण्याचा पर्याय यावर सुद्धा मिळतो.

चिंगारी (Chingari) 
ट्रेंडिंगमध्ये आलेले हे चिंगारी अ‍ॅप अँड्रॉयड आणि iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे. स्थानिक भाषेचे ऑप्शन यावर युजर्संना मिळतात. शॉर्ट व्हिडिओज शिवाय या 
अ‍ॅपमध्ये बातम्या वाचण्यासाठी एक खास फीचर दिले आहे.

रोपोसो (Roposo)
टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर वेगाने डाउनलोड होणाऱ्या या रोपोसो अ‍ॅप्समध्ये याचा समावेश झाला. यात युजर्संना अनेक भारतीय भाषेत व्हिडिओ बनवणे आणि शेयर करण्याचा ऑप्शन मिळतो. या अ‍ॅपमध्ये खूप सारे फिल्टर्स देण्यात आले आहे. व्हिडिओ बनवल्यानंतर युजर्संना काही कॉइन सुद्धा मिळतात.

एमक्स टकाटक (MX TakaTak) 
एमक्स टकाटक हे अ‍ॅप फेमस व्हिडिओ अ‍ॅप  MX प्लेयर कडून हे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप लाँच करण्यात आला आहे. या अ‍ॅप्समध्ये खूप सारी कॅटेगरी ऑफर केली जात आहे. हे अ‍ॅप भारतात बनवण्यात आले आहे.  प्ले स्टोरवर अँड्रॉयड युजर्संसाठी हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

हेही वाचा :  तुमच्या फोनमधील ॲप्स सुरक्षित राहण्यासाठी ही जबरदस्त ट्रिक फॉलो करा

 ट्रेल (Trell)
अ‍ॅपल वर वेगवेगळ्या भाषेत व्हिडिओ पाहून त्यांना शेअर केले जावू शकत. तसेच ट्रेलवर रेसिपी, ट्रॅव्हल आणि ब्यूटी पर्यंत खूप सारी कॅटेगरीत क्रिएटर्स व्हिडिओ पोस्ट करीत आहेत. तसेच याचा युआय पण खूप सोपा आहे.

मोज अ‍ॅप (Moj App)
भारतात बनलेल्या या मोज अ‍ॅपला लाखो युजर्संनी आतापर्यंत डाउनलोड केले आहे. गुगल प्ले स्टोरवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. अ‍ॅपवर युजर्स आपले आसपासच्या क्रिएटर्स यांना फ्रेंड्स बनवू शकतात. तसेच हा शेअरचॅट व्हिडिओ अ‍ॅप आहे.

बोलो इंडिया अ‍ॅप (Bolo India) 
इंडियन व्हिडिओ अ‍ॅपवर युजर्स शॉर्ट व्हिडिओज क्रिएट आणि शेयर करू शकतात. या अ‍ॅपद्वारे अनेक भाषेचे व्हिडिओज शेयर केले जावू शकतात. ज्यात हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी आणि उडिया इत्यादी भाषेचा समावेश आहे.

हेही वाचा : आकाराने अगदी लहान असलेला हा एसी तुम्हाला गरमीपासून राहत मिळवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे.

मिन्ट्रॉन अ‍ॅप (Mitron App)
तुम्हाला प्ले स्टोरवर येताच मित्रों अ‍ॅप दिसतो. हे अ‍ॅप जवळपास टिकटॉकसारखेच आहे. अँड्रॉयड युजर्ससाठी उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये ग्लोबल प्लॅटफॉर्मच्या टॉप व्हिडिओजसाठी फीड युजर्सला अ‍ॅप ओपन करताच दिसतात. तसेच याने शेअरिंग पण करता येते. 

लिट लॉट (LitLot) 
लिट लॉट हे अ‍ॅप केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. शॉर्ट व्हिडिओज या अ‍ॅपमध्ये बनवले जावू शकते. या अ‍ॅपमध्ये ब्यूटी फिल्टर्स, बॅकग्राऊंड म्युझिक आणि इफेक्ट्स लावता येण्याचे विविध ऑप्शन मिळतात.

हॉटशॉट (HotShots) 
गाना अ‍ॅप प्लॅटफॉर्म हॉटशॉट युजर्संना शॉर्ट व्हिडिओज बनवण्यासाठी आणि डायलॉग्सवर लिपसिंक करण्याचा पर्याय या हॉटशॉट अ‍ॅपमध्ये देण्यात आला आहे.  या अ‍ॅपचे १५ कोटी युजर्स आहेत. अ‍ॅपवर स्टोरीज शेयर शिवाय शॉर्ट व्हिडिओ बनवता येणार.

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Top 10 Desi Tiktok Alternative Apps Which Are Made In India