Train Ticket : ट्रेन चुकली आता तिकीटाचं काय करायचं?Dont Worry, त्याच तिकीटावर करा दुसऱ्या ठिकाणचा प्रवास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Train Ticket

Train Ticket : ट्रेन चुकली आता तिकीटाचं काय करायचं? Don't Worry, त्याच तिकीटावर करा प्रवास!

Train Travel : कितीही घाई केली तरी तूमचीही ट्रेन कधीतरी चुकली असेल. तूम्हालाही दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत तासंतास बसावे लागले असेल. दुसरी ट्रेन पकडल्यानंतर आहे ते तिकीट रेल्वेच्या खिडकीतून उडत ट्रॅकवर पडते, किंवा दुसऱ्या दिवशी खिशातून काढून आई ते कचऱ्यात फेकते.

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र बहुतांश प्रवाशांना रेल्वेच्या नेहमीच्या वापरातील नियमांबद्दल पुरेशी माहिती नसते. तूम्हीही ट्रेन चुकली म्हणून स्टेशनवर बसला असाल तर ही बातमी तूमच्या कामाची आहे. कारण, तूम्हाला सोडून गेलेल्या त्या ट्रेनचं तिकीट तूमच्या मदतीला येऊ शकतं. कसं ते पाहुया.

तूमच्या चुकलेल्या ट्रेनच्या तिकीटाने तुम्ही त्याच रूटवरील इतर ट्रेनमध्ये प्रवास करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? असा एक नियम लोकांनी नाही तर लोकांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेनेच बनवला आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

जर तुमची रेल्वे सूटली, तर तिच्या तिकीटावर दुसऱ्या पुढच्या रेल्वेचा प्रवास करता येतो का? तर यांचे उत्तर तुमच्या तिकीटाच्या श्रेणीवर अवलंबून आहे. रेल्वेच्या नियमानुसार, जर तुम्ही तिकीट आरक्षित केले असेल आणि रेल्वे चुकली तर तुम्हाला दुसऱ्या रेल्वे तिकीटावर सफर करता येत नाही.

रेल्वेच्या नियमानुसार, तुमची जागा आरक्षित ठेवण्यात येते. त्यामुळे त्याच ट्रेनमधून तुम्हाला प्रवेश करता येतो. पण ही रेल्वे हातची सूटली तर दुसऱ्या रेल्वेने तुम्हाला प्रवेश करता येत नाही. पण इतर तिकीटावर असा प्रवास करता येत नाही.

तुमच्याकडे रेल्वेचे जनरल तिकीट असेल तर त्याच तिकीटावर दुसऱ्या रेल्वेनेही तुम्हाला सफर करता येतो. कारण तुमच्याकडे सर्वसाधारण श्रेणीचे तिकीट असते आणि हे तिकीट सर्वच रेल्वेत ग्राह्य असते. रिझर्व्ह तिकीटासाठी मात्र हा नियम लागू नाही. रेल्वे सूटल्यावर तुम्हाला नवीन तिकीट खरेदी करावे लागते.

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्ही तुमच्या ट्रेनमध्ये सीट आरक्षित केली असेल आणि तुमची ट्रेन चुकली असेल, तर तुम्ही त्याच तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही.

चुकलेल्या रेल्वेचे तिकीट पुन्हा वापरता येते

चुकलेल्या रेल्वेचे तिकीट पुन्हा वापरता येते

जर तुमच्याकडे रिझर्वेशन नसलेले तिकीट असेल. तर तुम्ही त्याच तिकिटावर त्याच रूटवर धावणाऱ्या इतर कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. असे केल्याने TTE तुमच्याकडून दंड आकारणार नाही. पण ज्या दिवशी तुमची ट्रेन सुटते त्याच दिवशी तुम्हाला ते तिकीट वापरावे लागणार आहे.

हि सुविधा आधीच रिझर्व्ह तिकिटावर दिली जात नाही. जर तुम्ही ट्रेनमध्ये सीट आरक्षित केली असेल आणि काही कारणास्तव ट्रेन चुकली असेल. तर अशा परिस्थितीत तुम्ही त्या तिकिटासह इतर कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही.

तुम्ही असे तिकीट घेऊन दुसर्‍या ट्रेनने प्रवास केल्यास, तुमच्याशी विना तिकीट प्रवास केला असे मानून दंड आकारला जाईल. त्यामूळे तुम्ही भारतीय रेल्वेच्या अटी आणि नियमांनुसार रिफंड मिळण्यासाठी रेल्वे खात्याशी संपर्क करू शकता.

जर तुम्हाला रिफंड हवा आहे, तर त्यासाठी तिकीट रद्द करण्याची गरज नाही. त्यासाठी टीडीआर फाईल करावे लागते. निर्धारीत वेळेत तुम्ही निश्चित रेल्वे प्रवास का करु शकला नाही, याचं कारण तुम्हाला सांगावे लागते. ट्रेन का मिस झाली याची माहिती तुम्हाला द्यावी लागते.

कसा मिळवाल रिफंड

  • - तूम्हाला रिफंड हवा असेल तर तिकीट रद्द करू नका. हि स्कीम करा आणि लगेच रिफंड मिळवा

  • - यासाठी तुम्ही टीडीआर सबमिट करू शकता.

  • - यामध्ये तुम्हाला त्या प्रवास न करण्याचे कारणही सांगावे लागेल.

  • - चार्ट तयार केल्यानंतर तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जात नाही.

  • - चार्टिंग स्टेशनवरून ट्रेन सुटल्यानंतर तुमच्याकडे टीडीआर नोंदणी करण्यासाठी एक तास असतो.

अनेकदा घाईत, गर्दीच ट्रेन मिस होतेच

अनेकदा घाईत, गर्दीच ट्रेन मिस होतेच

ट्रेनचा चार्ट तयार करण्यापूर्वीच तुम्ही तिकीट रद्द केले तर रक्कम परत मिळविण्यासाठी दावा करता येतो. पण ट्रेनचा चार्ट तयार झाल्यावर तिकीट रद्द केल्यास तुम्हाला रक्कम रिफंड मिळत नाही. तसेच टीडीआर ही तात्काळ फाईल केला तरच फायदा होतो. एक तासानंतर तुम्ही असा प्रयत्न केल्यास रिफंड मिळण्यात अडचण येते.

जर तूम्हाला त्याच ट्रेनने जायचे असेल तर

जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणाने चुकली, तर टीटीई तुमची सीट पुढील दोन स्टेशनपर्यंत कोणालाही देऊ शकत नाही. म्हणजेच पुढील दोन स्थानकांवर तुम्ही ट्रेनच्या आधी पोहोचून तुमचा प्रवास पूर्ण करू शकता. पण लक्षात ठेवा, दोन स्टेशननंतर टीटीई आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशाला जागा देऊ शकते. पण तुमच्याकडे दोन स्टेशनचा पर्याय आहे.