ट्विटरची मोठी कारवाई! 46,000 भारतीय खात्यांवर घातली बंदी

twitter banned more than 46000 accounts of indian users in may over violation of its guidelines
twitter banned more than 46000 accounts of indian users in may over violation of its guidelines Sakal

नवी दिल्ली : ट्विटरने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल मे महिन्यात भारतीय वापरकर्त्यांच्या 46,000 हून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने रविवारी त्यांच्या मंथली कंपाइलेंस रिपोर्ट (monthly compliance report) मध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार ट्विटरने बाल लैंगिक शोषण, नॉन-कन्सेनच्युअल न्यूडिटी आणि इतर अशाच प्रकारच्या कंटेटसासाठी 43,656 खात्यांवर बंदी घातली आहे, तर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याबद्दल 2,870 खाती बॅन केली आहेत.

भारतात 1,698 तक्रारी

या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मला 26 एप्रिल 2022 ते 25 मे 2022 दरम्यान भारतात 1,698 तक्रारी लोकल ग्रीवांस मॅकनिजमच्या माध्यमातून प्राप्त झाल्या. यामध्ये ऑनलाइन गैरवर्तन/छळ (1,366), द्वेषपूर्ण वागणूक (111), चुकीची माहिती आणि मॅनिपुलेटेड मीडिया (36), संवेदनशील अडल्ट कंटेंट (28), फसवेगिरी (25) संबंधित तक्रारींचा समावेश आहे.

प्लॅटफॉर्मने या कालावधीत 1,621 युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (URLs) विरुद्ध देखील कारवाई केली, ज्यात ऑनलाइन छळ (1,077), द्वेषपूर्ण वर्तन (362) आणि संवेदनशील अडल्ट कंटेंट (154) संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्‍या URL चा समावेश आहे. याशिवाय, ट्विटरने खाते निलंबनाची विनंती करणाऱ्या 115 तक्रारींवरही कारवाई केली. कोणतेही अकाउंट सस्पेंशन रद्द केले नसल्याचे देखील या रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

रविवारी प्रसिध्द झालेल्या मंथली ट्रांसपेरेंसी रिपोर्टनुसार Google India ने बाल लैंगिक शोषण आणि हिंसक अतिरेकी कंटेंट यासारख्या हानिकारक कंटेंटचा प्रसार रोखण्यासाठी ऑटोमेटेड डिटेक्शनच्या मदतीने मे महिन्यात 393,303 हानिकारक कंटेंटवर कारवाई करत असा कंटेंट काढून टाकला आहे.

twitter banned more than 46000 accounts of indian users in may over violation of its guidelines
SBIच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी नवे नियम

WhatsApp कडून 1.9 मिलीयन खात्यांवर बंदी

वापरकर्त्याच्या तक्रारींमुळे टेक जायंट WhatsApp ने 62,673 कंटेंट देखील काढून टाकला आहे. शुक्रवारी, META-मालकीच्या WhatsApp ने देखील जाहीर केले की, त्यांनी नवीन IT नियम 2021 चे पालन करून मे महिन्यात भारतातील 1.9 दशलक्षाहून अधिक अशा खात्यांवर बंदी घातली आहे. प्लॅटफॉर्मने एप्रिलमध्ये भारतात 16.6 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली. कंपनीला मे महिन्यात देशभरात 528 तक्रारी संबंधी रिपोर्ट प्राप्त झाले आणि कारवाई करण्यायोग्य खाती 24 होती. एप्रिलमध्ये, व्हॉट्सअॅपवर देशभरात 844 तक्रारी प्राप्त झाल्या आणि यामध्ये कारवाई करण्यायोग्य खाती 123 होती.

नवीन IT नियम 2021 अंतर्गत, 5 मिलीयनहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मासिक कंपायलेंस रिपोर्ट प्रकाशित करणे आवश्यक आहे.

twitter banned more than 46000 accounts of indian users in may over violation of its guidelines
आता व्हॉट्सअॅपवर तुमचं ऑनलाईन दिसणंही होणार हाईड ! लवकरच येणार नवं फिचर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com