IPL: क्रिकेटप्रेमींसाठी 'ट्विटर लाईट'

टीम ई सकाळ
सोमवार, 10 एप्रिल 2017

मोमेंट्‌स बाय फेसबुक

याद्वारे तुम्ही मित्रांना हवे तेव्हा आणि जलदगतीने फोटो पाठवू शकता व ते परतही घेऊ शकता.

देशातील क्रिकेटप्रेमींसाठी इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट मालिकेच्या निमित्ताने ट्विटरने ग्राहकांसाठी 'ट्विटर लाईट' हे नवे अॅप्लिकेशन सुरू केले आहे. हे अॅप्लिकेशन 1 MB पेक्षा कमी आहे. 

मोबाईलवर हे अॅप प्रतिसेकंद 30 एमबीपेक्षा अधिक वेगाने वापरता येईल. यामुळे 70 टक्के डेटाची बचतही होणार आहे. ग्राहकांना पुश नोटीफिकेशन, ऑफलाइन सपोर्ट आदी सुविधाही अॅपमधून मिळणार आहेत. आयपीएलच्या सामन्यांचे स्कोअर अपडेट्‌स ग्राहकांना या अॅपद्वारे मिळणार आहेत. ट्‌विटरने या सुविधेसाठी व्होडाफोनशी करार केला आहे.

मोमेंट्‌स बाय फेसबुक

तुमचा मित्रांसोबतचा किंवा कुटुंबासोबतचा एखादा फोटो अल्बम तयार करण्यासाठी तुम्ही हे अॅप वापरू शकता. याद्वारे तुम्ही मित्रांना हवे तेव्हा आणि जलदगतीने फोटो पाठवू शकता व ते परतही घेऊ शकता. केवळ फोटोच नव्हे; तर यामध्ये तुम्ही व्हिडिओही ठेवू शकता. 
फेसबुकद्वारे या अॅपची निर्मिती केली असल्याने ते यूजर फ्रेंडली आहेच, तसेच याद्वारे तुम्ही स्लाईड शो किंवा व्हिडिओही तयार करू शकता.
 

Web Title: twitter lite for ipl cricket lovers