
Twitter News : व्हेरिफिकेशनसाठी व्हाईट हाऊस पैसे देणार नाही! Twitter ला मोठा धक्का
Twitter News : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter वर आजपासून लेगसी ब्लू टिक्स हटवले जाणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ब्लू टिक सुरू ठेवण्यासाठी लोकांना सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. जर कोणी ब्लू टिक सर्व्हिससाठी पैसे भरले नाहीत, तर त्याची सध्याची ब्लू टिक काढून टाकली जाईल. पण, व्हाईट हाऊसने ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे न देण्याचा निर्णय घेतलाय. वृत्तानुसार, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने ट्विटर प्रोफाइलसाठी पैसे खर्च करायला नकार दिलाय.
एलोन मस्कने गेल्या वर्षीच ट्विटर विकत घेतले. कंपनीची सूत्रे हाती घेतल्यापासून मस्क यांनी अनेक निर्णय घेतलेत. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन हा देखील त्याच्या वादग्रस्त निर्णयांपैकी एक आहे. या नव्या मॉडेलनुसार आता ट्विटरवर व्हेरिफिकेशनसाठी शुल्क भरावे लागणार आहे. त्याच वेळी, ज्यांना आधीच ब्लू टिक मिळाले आहेत त्यांना त्यासाठी शुल्क देखील भरावे लागेल.
कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवला
व्हाईट हाऊसबद्दल बोलायचं झाल्यास, इथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ट्विटर अकाउंटच्या व्हेरिफिकेशनसाठी पैसे दिले जाणार नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हाईट हाऊसचे डिजिटल स्ट्रॅटेजीचे हेड रॉब फ्लाहर्टी यांनी या प्रकरणी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे.
ट्विटर व्हेरिफाईड ऑर्गनायझेशन
ट्विटरने अलीकडेच व्हेरिफाईड ऑर्गनायझेशन सेवा सुरू केली आहे. या सर्व्हिस मध्ये एखाद्या कंपनीला ब्लू टिक सोबतच त्यांचा लोगो ही लावता येणार आहे.