Twitter वापरताय? मग हे वाचाच!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 मार्च 2020

- सोशल मीडियापैकी एक असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय.

नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आपल्या युजर्ससाठी नवंनवे फिचर्स देण्याचा प्रयत्न सर्वच माध्यमं करत असतात. आता ट्विटरने आपल्या युजर्ससाठी Fleet हे फिचर आणले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ट्विटरवरून ब्लॉग लिहिता येऊ शकतो. यासाठी पर्यायही देण्यात आला आहे. त्यानंतर आता ट्विटरवर फक्त Tweet नाही तर आता Fleet देखील करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून एडिट ट्विट फीचरची मागणी केली जात होती. त्यानुसार हे फिचर आणण्याचा विचार सुरु आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू असून, हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या फीचरसारखे असणार आहे.

सत्ता महाविकास आघाडीची पालकमंत्री भाजपचाच, वाचा हा घोळ

ट्विटरच्या युजर्सना आतापर्यंत फक्त ट्विट करण्याची सुविधा होती. मात्र, Fleet या नव्या फिचरच्या माध्यमातून फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टोरी आणि स्टेट्सचे फीचर पाहायला मिळणार आहे.

24 तासांनी Fleet होणार गायब

Fleet या नव्या फीचरच्या मदतीने जेव्हा एखाद्या व्यक्तीने ट्विट केलं तर ते एका वेगळ्या टाईमलाईनवर दिसणार आहे. हे फिचर व्हॉट्सऍप स्टेट्ससारखे असल्याने 24 तासांनंतर हे दिसणार नाही. 

Image result for Twitter Fleet

ब्राझीलमध्ये वापरण्यास सुरुवात

ट्विटरने सध्या हे फिचर सुरु केले असून, याचा वापर सध्या ब्राझीलमध्ये सुरू करण्यात आला आहे. ट्विटरने या नव्या फीचरला Fleet असे नाव दिले आहे.

280 अक्षरांची मर्यादा

Fleet अंतर्गत युजर्सना 280 टेक्स्ट कॅरेक्टर अ‍ॅड करता येईल. यात फोटो किंवा जीफ फाइल आणि व्हिडिओदेखील पोस्ट करता येणार आहे. तसेच इमोजीसाठी फ्लिटला रिस्पॉन्ड करू शकता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter is testing ephemeral tweets in Brazil and calling them Fleets