इस्त्रोची नवी पर्यावरणपुरक कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

नवी दिल्ली - एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला, त्याचे जगभरातून कौतुक झाले. त्यानंतर आता इस्त्रोने एक सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार संपूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे. 

तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र येथे या कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ही पर्यावरणपुरक कार उंच, सखल भागावर देखील चालविता येत असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. 

पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमुळे सध्या पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या नव्या कार सारखी वाहने बाजारात आल्यास प्रदुषण मुक्त अशी पर्यायी वाहतुक व्यवस्था निर्माण होऊ शकते असेही इस्त्रोने म्हटले आहे. 

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये हाय एनर्जी लिथियम बॅटरी बसविण्यात आली आहे. ही बॅटरी सूर्यप्रकाशावर चार्ज करता येणे शक्य आहे. अशा प्रकारची कार बनवितांना कारवर सोलार पॅनल बसविणे आणि त्याची बॅटरीशी जोडणी करणे हे मोठ आव्हान असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. 

Web Title: Unveiled - ISRO's solar hybrid electric car