'या' दिग्गज कंपन्या लवकरच घेऊन येतायत इलेक्ट्रिक स्कूटर, वाचा डिटेल्स

Upcoming electric Scooter hero honda tvs to launch best electric scooters in india soon
Upcoming electric Scooter hero honda tvs to launch best electric scooters in india soon esakal

Upcoming Electric Scooter : गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक टू-व्हीलर गाड्यांना मागणी वाढली आहे. बजाज ऑटोपासून ओलापर्यंत अनेक दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक क्षेत्रात प्रवेश केला आहे. या वर्षी अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होण्यासाठी सज्ज आहेत. आज आपण अशाचा 3 इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे भारतात लॉन्च होणार आहेत.

हिरो इलेक्ट्रिक स्कूटर (Hero Electric Scooter)

Hero Motorcorp या महिन्यात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यासाठी सज्ज आहे, जरी कंपनीने अधिकृतपणे या इलेक्ट्रिक स्कूटरचे डिटेल्स जारी केले नसले तरी, कंपनीने आगामी Hero इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझर शेअर केला होता, ज्यानंतर Hero चे चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आगामी नवीन Hero इलेक्ट्रिक स्कूटर स्लीक लुक, फ्लायस्क्रीन आणि लांब स्प्लिट सीटसह दिसत आहे

Upcoming electric Scooter hero honda tvs to launch best electric scooters in india soon
LPG Price : LPG सिलिंडर आजपासून महाग, द्यावे लागणार 105 रुपये जास्त

होंडा इलेक्ट्रिक स्कूटर (Honda Electric Scooter )

Honda Motorcycle & Scooter India 2023 च्या सुरुवातीला इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात प्रवेश करणार आहे. कंपनीने 2021 च्या उत्तरार्धात आपल्या डीलरशिपसह स्कूटरची व्यवहार्यता टेस्ट सुरू केली आहे. काही रिपोर्टनुसार होंडा PCX इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केले जाऊ शकते. ही तीच ई-स्कूटर आहे ज्याचे 2018 ऑटो एक्सपोमध्ये प्रीव्ह्यू करण्यात आले होते, Honda ने मे 2021 मध्ये भारतात त्याचे पेटंट दाखल केले होते. आगामी होंडा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिमूव्हेबल लिथियम-आयन बॅटरी असेल, ज्याला होंडा मोबाइल पॉवर पॅक असे नाव देण्यात येईल.

Upcoming electric Scooter hero honda tvs to launch best electric scooters in india soon
बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू

टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटर (TVS Electric Scooter)

TVS मोटर कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक नवीन इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर लॉन्च करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत अर्धा डझनहून अधिक इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. हे सर्व इलेक्ट्रिक मॉडेल्स कंपनीच्या नवीन EV सब-ब्रँड अंतर्गत सादर केले जातील. TVS Creon कॉन्सेप्टवर आधारित इलेक्ट्रिक स्कूटर नजीकच्या काळात येण्याची शक्यता आहे. स्कूटर 12kW इलेक्ट्रिक मोटर आणि 3 लिथियम-आयन बॅटरीसह ऑफर केली जाऊ शकते.

Upcoming electric Scooter hero honda tvs to launch best electric scooters in india soon
तरुणाच्या हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, दुसरीकडे भावाकडून भावाची हत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com