Update Old Car : जुनी कार अपग्रेड करा, हे डिव्हाइस देतील ड्रायव्हिंगचा Smart अनुभव | Update Old Car : Upgrade your old car according to the new age, this device will change your driving experience                    | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Update Old Car

Update Old Car : जुनी कार अपग्रेड करा, हे डिव्हाइस देतील ड्रायव्हिंगचा Smart अनुभव

Update Old Car : आजकाल भारतीय बाजारात एकापेक्षा एक दमदार कार आहेत. कार बनवणाऱ्या गाड्याही खूप डेव्हलप होत आहेत. अशावेळी तुम्हीही स्वत:मध्ये आणि कारमध्ये स्मार्टनेस आणणं गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी अपडेट कराव्या लागतील.

जून्या कारला स्मार्ट बनवण्यासाठी काही गोष्टी कारमध्ये बसवाव्या लागतील. या स्मार्ट वस्तूंमुळे तुमचा कार चालवण्याचा अनुभवही बदलणार आहे. जर तुमची कार जुनी असेल तर तुम्ही हे 4 फीचर्स इन्स्टॉल करू शकता. ज्यामुळे तुमची कारही अपग्रेड दिसेल.

हेड अप डिस्प्ले

हेड-अप डिस्प्लेमुळे तुम्ही कार अपग्रेड करू शकता. इन्स्ट्रुमेंट कन्सोलकडे तुमचे लक्ष वेधले जाणार नाही. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारचा वेग, इंधन मीटर इत्यादी पाहू शकता. यामुळे, तुम्ही अपघात देखील टाळू शकता.

डॅश कॅमेरा

हे एक ऍडव्हान्स फिचर आहे जे तुमच्या कारला स्मार्ट बनवते. हा कॅमेरा तुम्ही कारच्या मिररखाली फिट करू शकता. यामुळे, तुम्ही कार चांगल्या प्रकारे चालवू शकता. जे तुम्ही कारच्या डॅशबोर्डवर इन्स्टॉल करू शकता. यामुळे मोठ्या अपघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो. साधारणपणे, रीअरव्ह्यू मिररच्या खाली आणि विंडशील्डजवळ ते स्थापित करणे चांगले आहे.

वायरलेस चार्जर

सध्या प्रत्येक कारमध्ये वायरलेस चार्जर असतोच. कोणत्याही लांबच्या प्रवासासाठी हे फिचर उपयोगी असले. तरी प्रवासात जास्तवेळ जात असल्याने त्याने फायदा होतो. घाईच्यावेळी जेव्हा लो बॅटरी फोन घेऊन तुम्ही बाहेर पडता तेव्हा हा चार्जर तुमची मदत करतो.

टॅग्स :carDriving Tips