पेगी व्हिटसन यांचा आठव्यांदा 'स्पेस वॉक'

पीटीआय
शुक्रवार, 31 मार्च 2017

अवकाशात सर्वांत अधिक काळ चालण्याचा विक्रम सुनीता विल्यम्स यांच्या नावावर असून त्या आतापर्यंत 50 तास चाळीस मिनिटे अवकाशात चालल्या आहेत.

केप कॅनव्हेराल : सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी महिला अवकाशवीर असलेल्या पेगी व्हिटसन (वय 57) यांनी आज आठव्यांदा अवकाशातून चालत जात (स्पेस वॉक) नवा विक्रम प्रस्थापित केला. इतक्‍या वेळा 'स्पेस वॉक' करणाऱ्या त्या पहिल्याच महिला अवकाशवीर ठरल्या आहेत.

व्हिटसन आणि त्यांचे सहकारी शेन किमबरो यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून बाहेर पडत येथे येणाऱ्या अवकाशयानांसाठी पार्किंगसाठी जागा (डॉकिंग पोर्ट) तयार करण्याच्या कामास सुरवात केली.

अवकाशात सर्वांत अधिक काळ चालण्याचा विक्रम सुनीता विल्यम्स यांच्या नावावर असून त्या आतापर्यंत 50 तास चाळीस मिनिटे अवकाशात चालल्या आहेत.

या 'स्पेस वॉक' दरम्यान व्हिटसन या हा विक्रमही मोडतील. व्हिटसन या गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून अवकाशस्थानकात असून त्या तिसऱ्यांदा अवकाशस्थानकात आल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक दिवस अवकाशात व्यतित केले असून असे करणाऱ्याही त्या पहिल्या महिला आहेत.

Web Title: US astronaut Peggy Whitson, Shane Kimbrough space walk