esakal | कुटुंबातील सदस्यांची काळजी वाटत राहते? या अ‍ॅपमधून करा त्यांचे लोकेशन ट्रॅक
sakal

बोलून बातमी शोधा

use these location tracker apps to know whereabouts of your family Marathi article

आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत , ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे आपल्या प्रियजनांचे लोकेशन ट्रॅक करुन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकता. जेणेकरुन ती व्यक्ती कुठे आहे याबद्दल अपडेट राहता येते. आज आपण अशाच काही अ‍ॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत. 

कुटुंबातील सदस्यांची काळजी वाटत राहते? या अ‍ॅपमधून करा त्यांचे लोकेशन ट्रॅक

sakal_logo
By
टीम ईसकाळ

जेव्हा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा त्या व्यक्तिच्या सुरक्षितपणे घरी परत येण्यापर्यंत  त्यांची कळजी आपल्याला वाटत राहते. खासकरुन मुलींच्याबाबतीत आई-वडिल जास्तच चिंतेत असतात. रात्री उशिरा मुली, महिली घराबाहेर असतील तर कुटुंबातील व्यक्तीना काळजी वाटत राहते. या समस्येपासून टेक्नोलॉजिच्या मगतीने कायमची सुटका करुन घेता येऊ शकते. 

आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत , ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे आपल्या प्रियजनांचे लोकेशन ट्रॅक करुन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकता. जेणेकरुन ती व्यक्ती कुठे आहे याबद्दल अपडेट राहता येते. आज आपण अशाच काही अ‍ॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत. 

फाइंड माय फ्रेंड्स (Find My Friends)

या अ‍ॅपच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील व्यक्तीना नकाशामध्ये सहजपणे शोधू शकता. तसेच हे अ‍ॅप त्यांचे सध्याचे निश्चीत स्थान (Real Time Location) दाखवते. याशिवाय तुम्हाला यामध्ये चॅट करण्याचा पर्यायही मिळतो. हे अ‍ॅप Android सह iOS वापरकर्ते देखील वापरू शकतात. आपण ते Google Play Store आणि अ‍ॅपस्टोअर वरून डाउनलोड करुन वापरू शकता. 

सखी (Vodafone Sakhi)

Vodafone ने अलीकडेच Vodafone Sakhi हे अ‍ॅप बाजारात आणले असून, त्याद्वारे कोणतीही महिला एका कॉलच्या मदतीने त्यांच्या लोकेशनची माहिती आपल्या कुटुंबीय आणि मित्रांना फक्त पाठवू शकतात. विशेष गोष्ट म्हणजे हे अ‍ॅप पूर्णपणे विनामूल्य असून ते वापरण्यासाठी स्मार्टफोन किंवा इंटरनेटची देखील आवश्यकता नाही. यासोबतच आपल्याला इतरही बर्‍याच सुविधा तुम्हाला  या अ‍ॅपमध्ये तुम्हाला मिळतील. सोबतच आपण यामध्ये इमर्जन्सी टॉक टाइम घेऊ शकता आणि रिचार्ज पॅक संपल्यानंतर, आपत्कालीन टॉक टाइमद्वारे 10 मिनिटांचा अतिरिक्त टॉक टाइम घेऊन आपण कुटुंबास आवश्यक संदेश देऊ शकता. 

यात देण्यात आलेले फीचर्स जसे की, Emergency Alert या पर्यायाद्वारे कठीण परिस्थितीत 10 मित्र किंवा कुटुंबाचील व्यक्तीस तुमच्या लोकेशनसह आपत्कालीन सूचना पाठवली जाते. विशेष म्हणजे हा पर्याय वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. Private Number या पर्यायाद्वारे आपण आपला मोबाइल नंबर कोणासहही न देता  रिचार्ज करता येतो. बहुतेकदा असे घडते की महिला रिचार्जसाठी जातात, दुकानदार किंवा आसपास उभे असलेले लोक त्यांचा नंबर लक्षात ठेवतात आणि नंतर कॉल करून त्यांना त्रास देतात, परंतु सखीचा प्रायव्हेट नंबर सुविधेद्वारे, महिला दुकानदाराला न सांगता त्यांचा नंबर रिचार्ज करू शकतील.

गुगल मॅप्स (Google Maps) 
 
गुगल मॅप्स ये अ‍ॅप वापरुन तुम्ही मित्र किंवा कुटूंबातील सदस्य सध्या  कोठे आहेत शोधू शकता, म्हणजे आपण मित्र किंवा आपल्या ओळखीच्या लोकांचे Real Time Location जाणून घेऊ शकता.

आयफोन वापरकर्ते गूगल मॅप्स अ‍ॅपच्या साइड मेनूमधून शेअर लोकेशन ऑप्शन निवडून हे फीचर वापरू शकतात. आपले लोकेशन आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत शेयर केले जाऊ शकते. येथे वापरकर्त्यास त्यासाठी ठरावीक फोन क्रमाक निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. लोकेशन शेयर करताना, मित्रांना फेस आइकॉन दिसेल, जेणेकरून आपण कोठे जात आहात हे आपल्या मित्रांना कळेल.