इन्स्टाग्रामवर व्हिडिओ रिप्लेची सोय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

लोकप्रिय फोटो शेअरिंग ऍप असलेल्या इन्स्टाग्रामवर युजर्सचे लाइव्ह व्हिडिओ इतर युजर्सना शेअर करता येणार आहेत. इन्स्टाग्राममधील स्टोरीज या फिचरमध्ये युजर्सना 24 तासांसाठी व्हिडिओ शेअर करता येतील. यापूर्वी युजर्सचे लाइव्ह प्रसारण संपल्यानंतर संबंधित व्हिडिओ अदृश्‍य होत असल्याने तो तातडीने पाहणे गरजेचे होते. मात्र, नव्या फिचरमुळे ही मर्यादा दूर झाली आहे.

""आम्ही 21 जूनपासून लाइव्ह व्हिडिओचे रिप्ले शेअर करण्याचा पर्याय दिला असून, तुमच्या मित्रांना लाइव्ह व्हिडिओ पाहता न आल्यास तो नंतर सवडीने पाहता येईल,'' असे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. यासाठी युजर्सना व्हिडिओ संपल्यावर तळाशी असलेल्या शेअर बटनवर टॅप करावे लागेल. त्यानंतर 24 तासांसाठी तो स्टोरीजमध्ये दिसेल. इन्स्टाग्राम स्टोरीजवरील युजर्सची संख्या 25 कोटींवर पोचली असून, एप्रिलपासून या संख्येत तब्बल पाच कोटींची भर पडली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीज हे फिचर कंपनीने मागील वर्षी उपलब्ध करून दिले होते. या फिचरद्वारे युजर्सना 24 तासांनंतर अदृश्‍य होणारी छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करण्याची सोय झाली आहे.

Web Title: Video Replay facility on Instagram