Vivo V27 Pro Quick Review : तरुणांना भारी क्रेज असणाऱ्या या स्टायलिश डिझायनर फोनचा परफॉर्मंस कसा आहे? l Vivo V27 Pro review stylish design how it perform know in detail | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivo V27 Pro Quick Review

Vivo V27 Pro Quick Review : तरुणांना भारी क्रेज असणाऱ्या या स्टायलिश डिझायनर फोनचा परफॉर्मंस कसा आहे?

Vivo V27 Pro Quick Review : 37,999 रुपयांच्या किंमतीचा हा फोन उत्कृष्ट डिझाइनसह येतो. यात अनेक फीचर्स आहेत जे वापरकर्त्यांचा अनुभव लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. यात रिंग लाइट सगळ्यात वर आहे. तुम्हाला फोनमध्ये दिलेले पॉवरफुल फीचर्स आवडतील का आणि हा फोन तुमच्यासाठी या किंमतीत योग्य पर्याय ठरेल का, याचा संपूर्ण आढावा आज आपण घेणार आहोत. चला तर बघुयात Quick Review.

Vivo V27 Pro- डिझाइन आणि डिस्प्ले:

या फोनची डिझाइन अमेझिंग आहे. बर्‍याच दिवसांनी Vivo मधील हा फोन पाहिल्याबरोबर त्याचे डिझाईन लोकांना आवडले आहे. या फोनचा रंग आहे मॅजिक ब्लू. रंग अतिशय उत्कृष्ट आणि डिसेंट दिसत आहे. फोनचा लूक खूपच प्रभावी आहे आणि तो हातात धरायला खूप छान वाटतो. फोनच्या बॅक पॅनलवर चमकदार लुक देण्यात आला आहे. वरच्या बाजूला कॅमेरा सेटअप आहे आणि त्याच लेव्हलवर रिंग लाइट देण्यात आला आहे. फोन नक्कीच थोडा स्लिपरी आहे, त्यामुळे फोनचे कव्हर लावूनच त्याचा वापर करा. फोन स्लिम आहे आणि कव्हर लावल्यानंतरही फोन बेंड होत नाही.

डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर यात 6.78 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे. फोनचा डिस्प्ले चांगला आहे. फोनवर व्हिडिओ पाहणे अगदी रंजक ठरते. हाय क्वॉलिटी चित्रपटांपासून हलक्या चित्रपटांपर्यंत, रंगांची जबरदस्त क्वॉलिटी तुम्हाला या फोनमध्ये बघायला मिळेल. रिफ्रेश रेट आणि डिस्प्ले पॅनलचे काँबिनेशनही खूप चांगले आहे. थेट सूर्यप्रकाशात जाताना तुम्हाला फोनची ब्राइटनेस वाढवण्याची गरज नाही. तुम्हाला स्पष्ट डिस्प्ले दिसेल. फोनचा डिस्प्ले कर्व्ह आहे आणि तो या फोनला प्रिमियम लुक देतो. एकूणच त्याचा डिस्प्ले चांगला आणि चमकदार आहे.

Vivo V27 Pro- परफॉर्मंस :

Vivo V27 Pro ला 4nm MediaTek Dimensity 8200 SoC देण्यात आली आहे ज्यात 12 GB पर्यंत RAM देण्यात आली आहे. या फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. 12 जीबी रॅम व्हेरिएंट आणखी पावरफुल असेल. 8 जीबी रॅम वेरिएंटबद्दल बोलायचे तर तेही काही कमी नाही. सुरुवातीच्या टप्प्यात फोन खूप चांगले काम करत आहे. तुम्ही त्याची रॅम 8 GB पर्यंत वाढवू शकता. यानंतर फोनची रॅम 16 GB पर्यंत असेल. फोनवर बॅकग्राउंडमध्ये किती अॅप्स काम करतील हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळेल. यासोबतच तुम्हाला हा फोन मल्टीटास्कींगमध्ये कसा परफॉर्म करेल ते सुद्धा सांगुयात.

कॅमेरा आणि बॅटरी : फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 50-मेगापिक्सेल सोनी IMX766V लेन्स आहे. दुसरा 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. फीचर्स पाहता फोनचा कॅमेरा अप्रतिम असेल असे वाटते आहे. त्यांची गुणवत्ता देखील चांगली आहे.

बॅटरीच्या बाबतीतही फोन मजबूत दिसतो. फोनमध्ये 4600 mAh बॅटरी आहे जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अद्याप बॅटरीची चाचणी केलेली नाही. पण लवकरच याबद्दल देखील अपडेट मिळतील. (Smartphone)

टॅग्स :mobilephone5G Smart Phone