
Vodafone Idea ने आणले दोन दमदार प्रीपेड प्लॅन्स
Vodafone Idea : एकीकडे जिओ आणि एअरटेलनं 5G नेटवर्क लाँच करत आपले ग्राहक वाढवत आहे. तर दुसरीकडे या दोघांना टक्कर देण्यासाठी वोडाफोन आयडिया देखील नवनवीन रिचार्ज प्लान्स आणत आहे.
आता देखील त्यांनी दोन नवे खास नवे रिचार्ज प्लान्स ग्राहकांसाठी आणले आहेत. यांची किंमत अनुक्रमे ३६८ आणि ३६९ अशी असून दोन्हीमध्ये केवळ एका रुपयाचा फरक आहे. पण दोन्हीमध्ये मिळणारे फायदे मात्र वेगवेगळे आहेत.
दोन्हीमध्ये 2GB डेटा दररोज मिळणार असून नेमका कोणता प्लान तुमच्यासाठी परफेक्ट आहे , हे जाणून घेण्यासाठी दोन्ही प्लान्स सविस्तर जाणून घेऊ...
Vi चा ३६८ रुपयांचा प्लान
वोडाफोन आयडियाचा ३६८ रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. याच्यात 2GB डेटा दररोज वापरण्यासाठी मिळणार असून अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच या प्लानमध्ये SunNXT चं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे. तसंच युजर्सना हिरो अनलिमिटेड बेनिफिट्स Vi कडून दिले जाणार आहेत. याशिवाय विकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाईट्स आणि बिंज ऑल नाईट हे सारंही सामिल आहे.
Vi चा ३६९ रुपयांचा प्लान
वोडाफोन आयडियाचा ३६९ रुपयांचा प्लान देखील जवळपास ३६८ रुपयांच्या प्लानप्रमाणेच फायदे देतो. याची व्हॅलिडिटी देखील ३० दिवसांचीच आहे. याच्यातही 2GB डेटा दररोज वापरण्यासाठी मिळणार असून अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.
यासोबतच या प्लानमध्ये देखील युजर्सना हिरो अनलिमिटेड बेनिफिट्स Vi कडून दिले जाणार असून विकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाईट्स आणि बिंज ऑल नाईट हे सारंही सामिल आहे.
पण या प्लानमध्ये एक खास गोष्ट आहे ती म्हणजे याच्यासोबत SonyLIV चं प्रिमीयम सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही प्लानमधील एक फरक म्हणाल तर ३६८ मध्ये SunNXT आणि ३६९ मध्ये SonyLIV चं सब्सक्रिप्शन असल्याने ज्या युजरला जे सब्सक्रिप्शन हवं तो तो प्लान घेऊ शकतो.