Volvo Price Hike : व्होल्वोचा प्रवास महागणार? अशा वाढणार आहेत किंमती , जाणून घ्या

1 एप्रिलपासून देशात कठोर रिअल ड्रायव्हिंग एमिशन ( RDE ) नियम लागू करण्यात येणार
Volvo Price Hike
Volvo Price Hikeesakal

Volvo Price Hike : 1 एप्रिलपासून देशात कठोर रिअल ड्रायव्हिंग एमिशन ( RDE ) नियम लागू करण्यात येणार आहेत. कठोर उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी ऑटो कंपन्या लाइनअप अपडेट करत आहेत. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर, VE कमर्शियल व्हेइकल्स ( VECV ) च्या विविध मॉडेल्सच्या किमती पाच टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. व्होल्वो ग्रुप आणि आयशर मोटर्स यांच्या जॉइंट व्हेंचर असलेल्या VECV चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) विनोद अग्रवाल यांनी याबाबतचं सूतोवाच केलं आहे.

Volvo Price Hike
Travel News : सगळीकडे फिरून झालं आता कुटुंबसह ही ट्रीप एन्जॉय करा, वाचा खर्च अन् ठिकाण

व्हीईसीव्ही 4.9-55 टन जीवीडब्ल्यूचे ट्रक तसेच 12 ते 72 आसन क्षमतेच्या बसेसची विक्री करते. अग्रवाल म्हणाले की, खर्च वाढीचा प्रश्न बघता तो BS-IV वरून BS-VI मध्ये शिफ्ट होईल असं नाही. माझ्या मते खर्चात तीन ते पाच टक्के वाढ व्हायला हवी. 1 एप्रिलपासून लागू होणार्‍या नवीन उत्सर्जन निकषांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या वाहनांमधील बदलांबद्दल त्यांना विचारण्यात आलं होतं.

Volvo Price Hike
Technology Tips : Ola-Ather ला घाम फुटला, हिरो घेऊन येणार इलेक्ट्रिक स्कूटरची नवी रेंज

एप्रिलपर्यंत 100% उद्दिष्ट..

अग्रवाल म्हणाले की, मॉडेलमध्ये 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत टप्प्याटप्प्याने बदल होतील. 1 एप्रिलपासून आम्ही या गोष्टींचं 100 टक्के पालन करू. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सध्या भारत स्टेज VI च्या दुसऱ्या लेवलवर जाण्यासाठी काम करीत आहे. चारचाकी प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांना पुढील स्तरावरील उत्सर्जन मानदंडांची पूर्तता करण्यासाठी अधिक शुद्ध उपकरणांची आवश्यकता असेल.

Volvo Price Hike
Technology Tips : पृथ्वीसारखा दुसरा ग्रह, या ग्रहावर मिळेल २००० वर्षांचं आयुष्य

‘सेल्फ डायग्नोस्टिक’ डिव्हाईस आवश्यक...

उत्सर्जन पातळीचे निरीक्षण करण्यासाठी वाहनांमध्ये 'सेल्फ डायग्नोस्टिक' डिव्हाईस बसवावे लागेल. हे वाहनांच्या घटकांवर सतत लक्ष ठेवेल. जर वाहनातील उत्सर्जन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त होत असेल, तर प्रकाशाच्या माध्यमातून इशारा देण्यात येईल आणि वाहन दुरुस्तीसाठी पाठवावे लागेल.

Volvo Price Hike
Health Blog: उष्ट्रासन;नियमित सरावाने लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते,आणि..

70,000 कोटींची गुंतवणूक

1 एप्रिल 2020 पासून भारत BS-IV वरून BS-VI उत्सर्जन प्रणालीवर गेला आहे. यासाठी ऑटोमोबाईल उद्योगाला तंत्रज्ञान अपग्रेडेशनमध्ये 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली. यामुळे पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारी वाहने तयार होण्यास मदत होईल. मात्र, व्होल्वो बस-ट्रकच्या दरात वाढ झाल्याने व्होल्वो बसचे भाडेही वाढू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com