पाण्यावर चालणारी सायकल

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

सायकल चालविण्याचा छंद असणाऱ्यांना आता नदी, तलावापाशी थांबण्याची गरज नाही. संशोधकांनी पाण्यावरून चालू शकणारी "शिलर एक्‍स' ही वैशिष्ट्यपूर्ण सायकल बनवली आहे. कॅलिफोर्नियातील "शिलर' या क्रीडा साहित्य बनविणाऱ्या कंपनीने या सायकलची निर्मिती केली आहे.

दोन पोकळ सिलिंडरच्या आकाराच्या रचनेमुळे (पॉंटून्स) सायकल पाण्यात तरंगू शकते. ही 20 किलो वजनाची सायकल पाण्यात प्रतितास आठ नॉट वेगाने चालू शकते. सायकलच्या उजव्या किंवा डाव्या बाजूस फिरू शकणाऱ्या पात्यांमुळे सुकाणूची आवश्‍यकता भासत नाही. विशेष म्हणजे ही सायकल पाण्यात उलट्या बाजूनेही चालू शकते. विकसक जुडान शिलर यांनी सांगितले,""सायकल आणि पाण्यातील खेळांच्या प्रेमापोटी "शिलर एक्‍स वन' विकसित झाली आहे. सुटीचा आनंद घेण्याच्या हेतूने ही सायकल बनविण्यात आली आहे.''

चेनलेस कार्बन ड्राइव्ह बेल्ट यंत्रणेच्या साहाय्याने ही सायकल चालते. नेहमीच्या सायकलप्रमाणे पॅडलद्वारे ही सायकल पुढे जाते. पॅडलबरोबर हॅंडलबार, एलईडी लाइटही यात आहेत. अवघ्या दहा मिनिटांत या सायकलची जोडणी व सुटे भाग करता येतात. ती मोटारीच्या डिकीतही सहज मावते.

Web Title: Water running wheel