What is F5 : F5 प्रेस करण्याची तुम्हालाही आहे सवय; खरंच त्यानं काही PC Refresh होतो का? | What is F5 : What is F5 on keyboard What are the F1 f2 f3 f4 F5 on the keyboard | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

What is F5

What is F5 : F5 प्रेस करण्याची तुम्हालाही आहे सवय; खरंच त्यानं काही PC Refresh होतो का?

What is F5 : कमी वेळात अधिक काम व्हावे यासाठी की-बोर्डवर अनेक शॉर्टकट की दिलेल्या आहेत. मात्र, त्याचा योग्य वापर कसा करावा याची माहिती अनेकांना नाही. कॉम्प्यूटर काम करताना अनेक गोष्टींचा अनेकदा वापर केला जातो. यात मॅटर कॉपी किंवा कट करणे आदींचा समावेश असतो. यासाठी की-बोर्डवर शॉर्टकट बटण दिलेल्या आहेत. तसेच फंक्शन की दिलेल्या आहेत.

जर तुम्ही कंप्युटर वापरात असाल, तर तुम्ही function key बद्दल नक्की एकल असेल किंवा कीबोर्ड वर जे F1 तर F12 पर्यंत बटणं असतात, त्याबद्दल तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल कि ते काय असतात किंवा त्यांचा उपयोग कश्यासाठी होतो. त्यातल्या त्यात F5 याचा वापर सर्वाधिक लोक करतात. हे बटण तुमचा PC, Laptop रिफ्रेश करतं.

आपल्यापैकी बहुतेकांना रिफ्रेश बटण वारंवार दाबण्याची सवय असते. रिफ्रेश बटण दाबल्याने लॅपटॉपचा वेग अधिक वेगवान होतो हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. तंस खरचं होत का, आज याबद्दलच जाणून घेऊयात.

एफ 5 दाबल्याने वेग अधिक वेगवान होतो का?

डेस्कटॉपवर रिफ्रेश कमांड वापरल्याने काही मेमरी मोकळी होईल आणि युजर्सचे काम जलद होईल, असे अनेकांना वाटते. परंतु सत्य हे आहे की डेस्कटॉपवरील रिफ्रेश फंक्शन केवळ स्क्रीन आणि आयकॉनला ताजेतवाने करते, सिस्टम मेमरी नाही. सिस्टीमची काही मेमरी मोकळी करण्यासाठी काही अनावश्यक गोष्टी डिलीट करणं गरजेचं आहे.

रिफ्रेश बटणाचे खरे काम तेव्हा होते जेव्हा आपण डेस्कटॉप आयकॉनमध्ये काही बदल करता. आपल्या प्लेसमेंटमध्ये डेस्कटॉपवरील आयकॉन व्यवस्थित पाहण्यासाठी आपल्याला 'रिफ्रेश' बटण दाबणे आवश्यक आहे.

पण सहसा लोक रिफ्रेश बटण वारंवार दाबतात कारण त्यांना वाटते की यामुळे त्यांच्या संगणकाचा वेग वाढेल. पण याच्या अगदी उलट आहे. काही लोकांना सवय लागलेली ही फक्त वाईट सवय आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Function Key चे इतर बटण आणि उपयोग

  • F1 या बटणाचा वापर हेल्प की म्हणून केला जातो.

  • F2 या की चा वापर फाईलचे नाव बदलण्यासाठी होतो.

  • F3 विंडोजमध्ये या की चा वापर करून सर्च बॉक्स उघडू शकतो.

  • F4 माइक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करताना ही की प्रेस केल्याने आधी केलेले काम रिपीट होते.

  • F6 ही की प्रेस केल्याने विंडोजमध्ये ओपन असलेल्या फोल्डर्सचे कन्टेन्ट दिसतात.

  • F7 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये या की ला प्रेस केल्यावर आपण जे काही लिहितो त्याचे स्पेलिंग तसेच व्याकरण तपासले जाते.

  • F8 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेक्स्टला सिलेक्ट करण्यासाठी या की चा उपयोग केला जातो.

  • F9 मायक्रोसॉफ्ट आउटलूकमध्ये ई-मेल सेंड किंवा रिसिव्ह करण्यासाठी या की चा वापर होतो.

  • F10 कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये काम करताना या की ला प्रेस केल्याने मेन्यू ओपन होतो.

  • F11 इंटरनेट ब्राउजर्समध्ये फूल स्क्रीन व्ह्यू करण्यासाठी या की चा उपयोग केला जातो.

  • F12 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ही की प्रेस केल्याने Savs As चे ऑप्शन ओपन होते.