
WhatsApp Account Ban : ‘व्हॉट्सअॅप’ने भारतातील २९ लाखांहून अधिक अकाऊंट केले बंद; जाणून घ्या कारण
मेटा-मालकीची कंपनी व्हॉट्सअॅपने जानेवारी महिन्यात भारतात 29 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंद करण्यात आलेल्या 36.77 लाख खात्यांपेक्षा हा आकडा खूपच कमी असून आयटी कायदा 2021 चे पालन करून कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
कंपनीने आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान 2,918,000 व्हॉट्सअॅप खाती बॅन करण्यात आली आहेत. यापैकी 1,038,000 खात्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घालण्यात आली आहे.
खात्यांवर बंदी का घातली?
देशात व्हॉट्सअॅपचे 50 कोटी युजर्स आहेत. यादरम्यान मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की जानेवारीमध्ये बनावट खात्यांविरोधात 1,461 तक्रारी प्राप्त झाल्या. यानंतर या प्लॅटफॉर्मचे कोणत्याही प्रकारच्या गैरवापरापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही स्वतः प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
दरम्यान, भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंगळवारी कंटेंट आणि इतर संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तक्रार अपील समिती (GAC) स्थापन करण्याची घोषणा केली.
नव्याने स्थापन केलेले पॅनेल टेक कंपन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि देशाचे डिजिटल कायदे मजबूत करण्यासाठी आलेल्या सूचनांवर लक्ष ठेवेल. आयटी मंत्रालयाने गेल्या महिन्यात तीन तक्रार अपील समित्या (जीएसी) स्थापन करण्याबाबत घोषणा केली होती.जे आयटी कायदा 2021 अंतर्गत हे आवश्यक आहे. इंटरनेट वापर हा ओपन, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी बनवण्यासाठी तसेच नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने आयटी कायद्यात काही सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत .
लवकरच मेसेज कराता येणार एडीट
व्हॉट्सअॅपच्या सर्व लेटेस्ट अपडेट्सबद्दल माहिती देणारी साइट Wabetainfo ने म्हटले आहे की कंपनी एका नवीन फीचर्सवर काम करत आहे. ज्याद्वारे वापरकर्त्यांना मेसेज एडीट करता येतील. व्हॉट्सअॅप मेसेज एडिटिंग फीचरवर वेगाने काम करत असल्याचं या रिपोर्टमध्ये समोर आले आहे. नवीन एडिट फीचर आल्यानंतर वापरकर्त्यांना 15 मिनिटांच्या आत कोणताही पाठवलेला मेसेज एडीट करता येईल.